घरCORONA UPDATECorona Update : मुंबईत कोरोनाचे ९७९ नवे रुग्ण; तर ४७ जणांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत कोरोनाचे ९७९ नवे रुग्ण; तर ४७ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ९७९ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २८ हजार ५५० इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ८६१ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या १९ हजार ३५४ इतके अॅक्टिव्ह केसेस मुंबईत आहेत. तर ७ हजार ३५ जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत १२ हजार ६०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख १ हजार ४४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा –

महाराष्ट्राला पाच ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्यातील ५८ पोलिसांचा गौरव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -