घरमुंबई‘जे.व्ही.पी.डी.’तील पुलाची जागा मेट्रोमुळे बदलली

‘जे.व्ही.पी.डी.’तील पुलाची जागा मेट्रोमुळे बदलली

Subscribe

मेट्रोच्या बाधंकामामुळे पुलाची जागा बदलावी लागत असून यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागणार आहे.

जे.व्ही.पी.डी जंक्शनवर जुहू वर्सोवा रस्त्यापासून सी.डी.बर्फीवाला रस्त्यांपर्यंत प्रस्तावित उड्डाणपूलांचे बांधकाम करण्यासाठी भारतीय विमान पत्तन प्राधिकरण (एएआय)च्या मालकीच्या बाधीत जमिनीचा मोबदला म्हणून ११ कोटी १६ लाख १३ हजार ९५० रुपये अदा करावी लागणार आहे. मेट्रोच्या बाधंकामामुळे पुलाची जागा बदलावी लागत असून यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागणार आहे. यासाठी विमान प्राधिकरणाला सुमारे ११ कोटी रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहेत.

या जागेवर उड्डाणपूल बनवणार

जे.व्ही.पी.डी जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व पश्चिम द्रुतगती मार्गापासून वर्सोवा मार्गापर्यंत विना सिग्नल प्रवासाच्या हेतूने सी.डी.बर्फीवाला रोड ते जुहू वर्सोवा रोड पर्यंत अस्तित्वात असलेल्या ३६.६० मीटर रुंदीच्या रस्यालगत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. परंतु याठिकाणी प्रस्तावित मेट्रो लाईन २ बीचे काम हे गुलमोहर रस्त्यांपर्यंत त्याच मार्गावरून चालू असल्याने व जी.व्ही.पी.डी जंक्शनवर मेट्रो स्टेशनचे बांधकाम होणार असल्याने त्या मार्गावर उड्डाणपूल बांधणे शक्य नसल्याने या उड्डाणपूल जवळच उपलब्ध असलेल्या भारतीय विमान पत्तन प्राधिकरण यांच्या ताब्यातील जागेवर हे उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. त्यासाठी विमान प्राधिकरणाने जागा देण्यास तयारी दर्शवली होती. पण त्यापोटी एक रकमी किंमत मोबदला म्हणून अदा करण्याची मागणी त्यांनी केली होती.

- Advertisement -

त्यानंतर पुलाच्या बांधकामाला सुरुवात

उड्डाणपुलाने बाधित होणारी जमीन ही अंधेरी गावच्या नगर भू क्रमांक १९९मधील असून ती प्राधिकरणाच्या ताब्यातील आहे. उड्डाणपुलांच्या खांबाच्या बांधकामांनी बाधित एकूण अंदाजे १३४.३० चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन अंदाजे १ कोटी ४५ लाख ७१ हजार ५५० रुपये इतक्या रकमेचे थेट महाालिकेला हस्तांतरीत करणे आणि अंदाजे ८९४४ चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन राईट ऑफ वे म्हणून स्वतंत्र करारान्वये ९ कोटी ७० लाख ४२ हजार इतक्या रकमेने विमान प्राधिकरणास एकूण सुमारे ११ कोटी १६ लाख १३ हजार ९५० एवढी रक्कम देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. विमान प्राधिकरणाला जमिनीच्या मोबदल्याची ही रक्कम अदा केल्यानंतर पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -