घरमुंबईभिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Subscribe

भिवंडीतील शांतीनगर परिसरात चार मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी असल्याचे समजते.

भिवंडीतील शांतीनगर परिसरात चार मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी असल्याचे समजते. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून ढिगाऱ्याखालील लोकांचे बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अद्याप ४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून अजूनही ५ ते ६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

शनिवार, २४ ऑगस्टच्या मध्यरात्री शांतीनगर पिराणापाडा या परिसरात ही इमारत दुर्घटना घडली. जखमींना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सिराज अहमद अन्सारी आणि आखीब (वय २२) ही मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या इमारतीला तडे गेल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. रहिवाशांनी तत्काळ महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याची कल्पना दिली. यानंतर आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यात येत असतानाच इमारत कोसळली. यात आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.

दरम्यान, भिंवडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अशोक रणखांब यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. ते म्हणाले की, आम्ही ही इमारत रिकामी केली होती. परंतु काही जण या इमारतीत बेकायदेशीररित्या राहण्यास आले. त्यानंतर ही इमारत कोसळली. ही इमारत आठ वर्षे जुनी असून ती बेकायदेशीररित्या उभारण्यात आली होती. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त अशोक रणखांब यांनी दिली.

हेही वाचा –

सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -