घरमुंबईडोंबिवलीतील सेल्फी पॉइंटला अज्ञाताने लावली आग; केडीएमसीचे लाखो रूपये पाण्यात

डोंबिवलीतील सेल्फी पॉइंटला अज्ञाताने लावली आग; केडीएमसीचे लाखो रूपये पाण्यात

Subscribe

रविवारी रात्रीच्या सुमारास या सेल्फी पॉइंटला कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावल्याने हा सेल्फी पॉइंट आगीत जळून खाक झाला आहे.

कल्याण-डोंबिवली रेल्वे रुळा लगत असलेल्या समांतर रस्त्यावर पालिकेच्या वतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून सेल्फी पॉइंट उभारला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र रविवारी रात्रीच्या सुमारास या सेल्फी पॉइंटला कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावल्याने हा सेल्फी पॉइंट आगीत जळून खाक झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे.

टवाळांनी सेल्फी पॉइंट जाळला?

कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्याच्या कडेला असलेल्या सेल्फी पॉइंटला आग लावल्याची माहिती मिळताच अग्निमशन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत हा सेल्फी पॉइंट आगीत जळून खाक झाला होता. कल्याण डोंबिवलीकडे जाण्यासाठी हा शॉर्टकर्ट रस्ता असल्याने सध्या रस्त्यावर रहदारी वाढली असून, रस्त्यावर नवीन हॉटेल्स उघडली आहेत. तसेच रस्त्याच्या एका बाजूला प्रेमीयुगल आणि टवाळ खोर मुले उभे असतात. प्रेमीयुगलांचे अश्लिल चाळे सुरू असतात. मात्र याकडं पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. टवाळखोरांनीच सेल्फी पॉइंट जाळला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वच्छ व सुंदर डोंबिवली उपक्रमांतर्गत २०१६ मध्ये कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करून फायबर पासून तयार केलेला सेल्फी पॉइंट उभारला होता. शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन वर्षापूर्वी या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील विविध भागातही एकूण ६ सेल्फी पॉइंट उभारण्यात आले.

हेही वाचा – अलिबाग-विरार कॉरिडोर बाधितांचे एमएमआरडीएकडे साकडं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -