घरताज्या घडामोडी२ महिन्यांच्या बाळाचा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू

२ महिन्यांच्या बाळाचा डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू

Subscribe

खोकला आणि सर्दी ने आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संतापलेल्या चिमुकल्याच्या नातेवाईकानी डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार कल्याणातील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये घडला. मात्र हॉस्पीटल प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कल्याण नजीक मोहने परिसरात राहणारे नोमान काजी यांचा दोन महिन्याचा मुलाला सर्दी खोकला आणि कफचा त्रास झाल्याने सोमवारी सकाळी मुलगा शहझीनला घेऊन कुटुंबीय कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये आले होते.

मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरने औषध दिले. मुलाला परत घरी नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. मुलाला ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण केली. तसेच डॉक्टरवर कारवाईची मागणी केली जात आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी नोंद केल्या असून, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच पुढील प्रक्रिया पोलीस करणार असल्याचे सांगण्यात येते

- Advertisement -

 

डॉक्टरांनी मुलाच्या नातेवाईकांना मुलाची परिस्थिती पाहून त्याला हॉस्पिटलमध्ये एडमिट करण्याचा सल्ला दिला होता. मात्र अॅडमीट करण्यास नातेवाईक तयार नव्हते. मुलाला डॉक्टरने मॅफटेल पी हे औषध दिले हाेते. डॉक्टर ने कोणत्याही प्रकारचे निष्काळजी पणा केलेला नाही. – बालाजी शेट्टी, हॉस्पिटल प्रबंधक

 

खोकला आणि सर्दी झाल्याने त्याला श्रीदेवी हॉस्पीटलमध्ये आणलं होतं. मात्र डॉक्टरांनी ओेव्हरडोस दिला. डॉक्टरांचा निष्काळजीपणामुळेच चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. – फैजुल काजी, मुलाचा नातेवाईक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -