घरमुंबईजिवंत व्यक्तीला सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

जिवंत व्यक्तीला सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली

Subscribe

व्हायरल पोस्टमुळे सहन करावा लागला मनस्ताप

एका जिवंत व्यक्तीच्या छायाचित्र सोबत ’भावपूर्ण श्रद्धांजली’ चा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला असल्याची धक्कादायक प्रकार बोरिवली येथे उघडकीस आला आहे. हा मेसेज व्हायरल होत असताना ही व्यक्ती सासुरवाडीत पाहुणचार घेत असल्याचे कळताच या व्यक्तीचे हितचिंतक आणि नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. मात्र व्हायरल झालेल्या या मेसेजमुळे संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागल्यामुळे अखेर या व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन चुकीचा मेसेज व्हायरल करणार्‍या विरुद्ध लेखी तक्रार दिलेली आहे.

बोरिवली येथे राहणारे रवींद्र दूसंगे (४०) यांचे छायाचित्र लावून त्याच्या खाली ‘भावपूर्ण श्रद्धाजंली’ असे लिहलेला मेसेज रविवारी व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल साईडवर व्हायरल करण्यात आला होता. हा मेसेज रवींद्र दूसंगे यांचे नातेवाईक, मित्र परिवार हितचिंतक यांच्यापर्यंत जाऊन पोहचला होता. बघता बघता या मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यांच्या घरी लोकांनी एकच गर्दी केली. रवींद्र दूसंगे घरी नसल्यामुळे नक्की काय प्रकार आहे. हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी रवींद्र यांच्या मोबइलवर फोन करण्यात सुरुवात केली, त्यावेळी रवींद्र दूसंगे हे मालाड येथे सासुरवाडीत पाहुणचार घेत असल्याचे अनेकांना कळले आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

मात्र एवढ्यावर न थांबता हा मेसेज दूसंगे यांच्या गावापर्यंत व्हायरल झाला आणि नातेवाईक, बहीण यांची तर रडारड सुरु झाली होती. त्यांनी रवींद्रला फोन न करता घरी फोन करून कधी झाले कसे झाले या प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती. अखेर रवींद्रने याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चुकीचा मेसेज व्हायरल करणार्‍या विरुद्ध लेखी तक्रार दिलेली आहे. पोलिसांनी रवींद्र याचा अर्ज दाखल करून चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.रविवारी मी सासुरवाडीत पत्नी आणि मुलासोबत गेलो होतो, त्याठिकाणी मला सारखे फोन येऊ लागले. प्रत्येकजण माझ्या प्रकृतीबद्दल विचारू लागल्यानंतर मला ही गोष्ट कळली. मी जेव्हा माझे व्हाट्सअप आणि फेसबुक तपासले असता त्याच्यावर मला श्रद्धांजली वाहण्यात आली होती. या घटनेमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला असून तेवढाच मनस्ताप सहन करावा लागला असल्याचे रवींद्र दूसंगे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -