घरमुंबईआता आमचा सांभाळ करणार कोण?

आता आमचा सांभाळ करणार कोण?

Subscribe

मातृ पितृ छत्र हरपले, चौघेही भावंडे पोरकी झाली

आमच्या आईला मारहाण करून तिचा गळा दाबला. ती आम्हा भावंडाचा आधार होती, आता आमचा सांभाळ कोण करणार ? जेवायला कोण देणार ? डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत बारा वर्षीय अंजु शेट्टी ही सांगत होती. अंजुच्या वडिलांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. चारही भावंडांचा आईच सांभाळ करीत होती. मातृ पितृ छत्र हरपल्याने चौघेही पोरके झाले आहेत.

कल्याण शिळ रोडवर असलेल्या मानपाडा गाव येथील वझे चाळीत नगम्मा शेट्टी या चार मुली आणि एक मुलासह राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्या एका वडापाव गाडीवर भांडी धुण्याचे काम करत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी काम सोडले. काम सोडल्यानंतर वडापाव विक्रेताच्या कुटुंब आणि नगम्मांमध्ये वाद सुरू होता. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, काही महिलांनी मिळून नगम्मा शेट्टी हिला बेदम मारहाण केली. या मारहाणीची तक्रार नगम्मा हिने मानपाडा पोलीस ठाण्यात केली.

- Advertisement -

दरम्यान नगम्मा हिचा एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.माझ्या आईला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या मुलांनी केला असून, दोषींवर कारवाई करा अशी मागणी करीत आहेत. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणार्‍यांनी कुत्र्यावरून वाद झाल्याने नगम्मा यांना मारहाण झाल्याचे सांगितले. त्यामुळे नगग्मा यांना नेमकी मारहाण कोणत्या प्रकरणातून झाली याचा पोलीस तपास करीत आहे.

हृदय विकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू
नगम्मा हिचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. -विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण

- Advertisement -

कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू
तुझ्याकडे असलेल्या कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होतो, अशी तक्रार शेजारच्यांनी केल्याने झालेल्या वादात नागम्मा शेट्टी नावाच्या एका महिलेला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीत हा प्रकार घडला. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

डोंबिवलीमधील मानपाडा रोड भागातील एका चाळीत ही घटना घडली. या ठिकाणी नागम्मा शेट्टी नावाची एक गरीब महिला राहात होती. त्यांच्याकडे एक पाळीव कुत्रा होता. या पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होतो, अशी तक्रार या महिलेच्या शेजारच्यांची होती.

याच वादातून सोमवारी नागम्मा यांच्यासोबत शेजार्‍यांचे भांडण झाले. यावेळी वाद विकोपाला गेल्याने शेजारी राहणार्‍या महिलांना नागम्मा यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत नागम्मा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र स्थानिक भाजपच्या नेत्यांनी यात लक्ष दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक केली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -