घरक्रीडासोनाली पवारची चमकदार कामगिरी;राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण

सोनाली पवारची चमकदार कामगिरी;राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण

Subscribe

महाराष्ट्राने फलटण येथे झालेल्या १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे जेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या या सुवर्ण कामगिरीत नाशिकच्या सोनाली पवारने महत्त्वाची भूमिका बजावली. शासकीय कन्या शाळेची विद्यार्थी असणार्‍या सोनालीने एकाच वर्षात दोन राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. रांचीला झालेल्या ३० व्या ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही ती महाराष्ट्रकडून खेळली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

निशा वैजलनंतर एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सोनालीला मिळाली. ती नाशिकच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासकीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात गीतांजली सावळे व उमेश आटवणे यांच्या मार्गदर्शनात सराव करते.

- Advertisement -

तिच्या या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, शिक्षण सभापती सुरेखाताई दराडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकार, नाशिक क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीव अध्यक्ष रमेश भोसले, मुख्याध्यापक डॉ. चंद्रकांत साळुंखे, कविता साठे आदींनी तिचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -