घरमुंबईमुंबईत सिटी सेंटर मॉलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; घटनास्थळी आदित्य ठाकरेंची भेट

मुंबईत सिटी सेंटर मॉलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; घटनास्थळी आदित्य ठाकरेंची भेट

Subscribe

आग लागल्यानंतर मॉलच्या दुस ऱ्या-तिसऱ्यामजल्यावरील एकामागून एक दुकाने आगीच्या भक्षस्थानी

मुंबई सेंट्रल परिसरात सिटी सेटर मॉलला गुरुवारी रात्री लागलेली आग ३५ तासांनंतरही अद्याप धुसमत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीमध्ये मॉलचे दोन मजले पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळतेय. सध्या या ठिकाणी १४ पाईपलाईनच्या मदतीने आणि दोन मोठ्या शिडीच्या सहाय्याने मॉलच्या बाहेरुन सातत्याने पाण्याचा मारा सुरु आहे. मात्र मॉलमध्ये असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि दुकानातील लाकडी फर्निचर यामुळे ही आग अजूनही धुमसत आहे. आग लागल्यानंतर मॉलच्या दुसऱ्या-तिसऱ्यामजल्यावरील एकामागून एक दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच तासांहून अधिक काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आगीवर नियंत्रण मिळत नसल्यामुळे अखेर अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ची घोषणा केली होती. आगीचे रौद्ररूप आणि धूर यांमुळे अग्निशमन दलाला अनेक अडथळे येत होते. आगीवर नियंत्रण मिळवताना एक उपअग्निशमन अधिकारी आणि चार जवान जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी रात्री घटनास्थळाची पाहणी केली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर यासंबंधी माहिती देताना आपण प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत असल्याचं सांगितलं आहे. “सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसून आपले शूर जवान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,”

- Advertisement -

आग विझविताना एक अधिकारी, ४ जवान जखमी

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलातील उपअग्निशमन अधिकारी गिरकर (५०), अग्निशामक रवींद्र प्रभाकर चौगुले (५३) जखमी झाले, तर शामराव बंजारा (३४), भाऊसाहेब बदाणे (२६), संदीप शिर्के यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे या दोघांनाही तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.


मुंबई सेंट्रलमधील सिटी सेंटर मॉलमध्ये भीषण आग; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -