घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामकारक मजकूर आणि अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे सरचिटणीस मोहित भारतीय यांनी पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात भारतीय यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन काही भाडोत्री लोकांकडून प्रतिष्ठित व्यक्तीविरूद्ध शिवीगाळ, अपमानास्पद भाषा वापरून बदनामी केली जाते. अशा वाईट प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी भारतीय यांनी तक्रारीतून केली आहे.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर शिवीगाळ आणि बदनामी करण्याचे षडयंत्र काही व्यक्तींकडून सुरू असल्याने पोलिसांनी यासंदर्भात तक्रार दाखल करून घेतलयाची माहिती भारतीय यांनी दिली आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री, शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीस देखील कोकण दौऱ्यावर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -