घरमुंबई26 जानेवारीला धावणार मध्य रेल्वेवर एसी लोकल

26 जानेवारीला धावणार मध्य रेल्वेवर एसी लोकल

Subscribe

प्रजाकसत्ता दिनादिवशी ट्रान्स- हार्बरच्या प्रवाशांना गिफ्ट

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.अखेर प्रवाशांची एसी लोकलची प्रतीक्षा संपली आहे. मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धावणार आहे. स्वत: याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली आहे.ही लोकल ट्रान्स हार्बरच्या ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेल मार्गावर धावणार आहे. त्यामुळे यंदा मध्य रेल्वेचा प्रवास गारेगार होणार आहे.

मध्य रेल्वेवरील पुलाच्या उंचीमुळे पहिली एसी लोकल 2017 मध्ये पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आली. त्यानंतर एसी लोकलच्या उंचीवर तोडगा काढल्यानंतर कुर्ला कारशेडमध्ये 7 डिसेंबर 2019 रोजी पहिली एसी लोकल दाखल झाली आहे. या लोकलमध्ये काही तांत्रिक बदल करून त्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. एसी लोकल फेर्‍या सुरू करण्याकरिता तारीख निश्चित करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्याआठवड्यात शेवटची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर 10 दिवसांत मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल प्रवाशांकरिता सुरू केली जाईल असे संजीव मित्तल यांनी स्पष्ट केले आहे. एसी लोकलची क्षमता ताशी किमान 110 किमी वेगाने धावू शकते. त्यात, आसनांची संख्या 1028 असून उभ्याने 5936 इतके जण प्रवास करू शकतात. या लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने दरवाजे उघडबंद होतात. त्याचे नियंत्रण मोटरमन आणि गार्डकडे असून डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणाही पुरवण्यात आली आहे. स्वयंचलित पद्धतीचे दरवाजे असल्याने त्याबाबत वारंवार उद्घोषणा आहे.

- Advertisement -

100 कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण
आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा दरवाजा लवकर बंद न झाल्यास तात्काळ मदतीसाठी मध्य रेल्वेने 100 कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण दिलेले आहे. ही लोकल मेक इन इंडिया अंतर्गत बांधली असून त्यासाठी सुमारे 50 कोटी रुपये खर्च आला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लि. (भेल) ने त्यासाठी विद्युत यंत्रणा पुरविली आहे. चेन्नईतील आयसीएफ कारखान्यात ही लोकल तयार केली आहे.

एसी लोकल फेर्‍या सुरू करण्याकरिता तारीख निश्चित करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या आठवड्यात शेवटची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर 10 दिवसात मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल प्रवाशांकरिता सुरू केली जाईल.
– संजीव मित्तल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -