घरताज्या घडामोडीग्रँटरोडमधील अतिक्रमण हटवले; मोकळ्या जागेवर सफाई कामगारांची चौकी

ग्रँटरोडमधील अतिक्रमण हटवले; मोकळ्या जागेवर सफाई कामगारांची चौकी

Subscribe

मुंबई ग्रँट रोड पश्चिमेला असलेल्या डि.बी. मार्गला जोडणार्‍या मार्गावर असलेल्या महापालिकेच्या भूखंडावरील बांधकामांवर महापालिकेच्या डि विभागाच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता मोकळ्या जागेवर सफाई कामगारांची चौकी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई ग्रँट रोड पश्चिमेला असलेल्या डि.बी. मार्गला जोडणार्‍या मार्गावर असलेल्या महापालिकेच्या भूखंडावरील दोन मोठ्या बांधकामांवर सोमवारी महापालिकेच्या डि विभागाच्यावतीने बुलडोझर चालवण्यात आला आहे. या दोन्ही बांधकामांवर कारवाई करून एकूण १२६ चौरस मीटरचा भूखंड मोकळा करण्यात आला असून आता जागेवर भविष्यात आता सफाई कामगारांसाठी चौकी बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोकळ्या जागेवर आता सफाई कामगारांची चौकी उभारणार

ग्रँट रोड पश्चिमेला असलेल्या रेल्वे पुलाच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर कुटीर रेस्टॉरंटच्या माध्यमातून वाढीव बांधकाम करण्यात आले होते. याशिवाय अन्य एक बांधकाम या भूखंडावर उभारण्यात आले होते. या दोन्ही बांधकामांवर सोमवारी महापालिका डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये हॉटेलच्या वाढीव बांधकामांसह इतर बांधकाम पूर्णपणे हटवून भूखंड मोकळा करण्यात आला. महापालिकेच्या पथकासह ही धडक कारवाई करण्यात आली आहे. या मोकळ्या जागेवर सध्या केनेडी पूलाखाली असणारी सफाई कामगारांची चौकी उभारण्यात येणार असल्याची माहिती डि विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फेरीवाल्यांवरील कारवाई होणार अधिक तीव्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -