घरताज्या घडामोडीफेरीवाल्यांवरील कारवाई होणार अधिक तीव्र

फेरीवाल्यांवरील कारवाई होणार अधिक तीव्र

Subscribe

मुंबईत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने करण्यात येणार्‍या फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पुन्हा एकदा खासगी कंपनीच्या वाहनांची मदत घेण्यात येणार आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने करण्यात येणार्‍या फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी पुन्हा एकदा खासगी कंपनीच्या वाहनांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे आदींसाठी तब्बल ६६ वाहनांची मदत खासगी कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

अशी केली जाते फेरीवाल्यांविरोधात कारवाई

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्यावतीने रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करणार्‍या फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येते. फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करताना, त्यांच्याकडून जप्त केलेले साहित्य या वाहनांमधून गोदामांमध्ये नेले जाते. त्यानंतर गोदांमधील साहित्य फेरीवाल्यांकडून दंडाची रक्कम भरुन सोडवून नेले जाते. मात्र, या फेरीवाल्यांवरील कारवाई प्रभावी करण्यासाठी महापालिकेच्या चोर गाड्यांची संख्या आता कमी असल्याने खासगी अतिक्रमण निर्मुलन वाहनांची सेवा भाडेतत्वावर घेतली जात आहे. यापूर्वीही अशाचप्रकारे सेवा घेण्यात येत होती. परंतु, यापैकी पूर्व उपनगराचा कालावधी वगळता पश्चिम उपनगरे आणि शहर भागांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांकरता खासगी कंपनीकडून भाडे करारावर अतिक्रमण निर्मुलन वाहनांची सेवा घेतली जात आहे.

यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये प्रत्येकी तीन कंपन्यांची स्वतंत्र निवड करण्यात आली आहे. यामध्ये शहर भागासाठी सुपरवेज या कंपनीला २.९५ कोटी रुपये, पश्चिम उपनगरे विभागासाठी एस.डी.शिरोळे ट्रान्सपोर्ट कंपनीला ४.५४ कोटी रुपये आणि जय मल्हार हायरिंग सर्व्हिसेस कंपनील २.७५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -