घरमुंबईवैतागलेले संजय राऊत आणि दिलदार आदित्य ठाकरे

वैतागलेले संजय राऊत आणि दिलदार आदित्य ठाकरे

Subscribe

संजय राऊत व्यासपीठावरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना आग्रहाने आणि आदराने आपली खुर्ची दिली. आदित्य यांच्या या दिलदारपणाची सर्वत्र कौतुक होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांवर भाजप नेत्यांकडून सातत्याने अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. याविरोधात मविआने आज महामोर्चाचे आयोजन केले होते. मोर्च्यानंतर नेत्यांची भाषणांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार, उ्दधव ठाकरे, आदीत्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गज बसले होते. मात्र नेत्यांच्या संख्येच्या तुलनेत व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्च्या कमी होत्या. यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना बसण्यासाठी खु्र्चीच उपलब्ध नव्हती. यामुळे थोडेसे वैतागलेले राऊत व्यासपीठावरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात असताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना आग्रहाने आणि आदराने आपली खुर्ची दिली. आदित्य यांच्या या दिलदारपणाची सर्वत्र कौतुक होत आहे.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील जवळीक सगळ्यांनाच माहित असून आज महामोर्चाच्या निमित्ताने ती पुन्हा अधोरेखित झाली. आज सकाळी साडे नऊ वाजल्यापासून महामोर्चाला प्रारंभ झाला होता. मोठ्या संख्येने कार्यकरर्ते आणि नेतेमंडळी मोर्चात सहभागी होण्यासाठी येत होते. भायखळापासून सुरू झालेला हा मोर्चा रिर्डसन क्रूडास कंपनीवरून नंतर आझाद मैदानात पोहचला तेव्हा सगळेचजण घामाघूम झाले होते. सीएसएमटी स्थानकासमोर उभारण्यात आलेले व्यासपीठ गाठता गाठता तर सगळेजण थकले होते. संजय राऊतही या मोर्चात सहभागी होते. त्यांचीही दमछाक झाली होती. यामुळे व्यासपीठावर बसण्यासाठी ते स्टेजवर चढले. पण सर्वच खुर्च्यांवर नेतमंडळी विराजमान झाली होती आणि राऊत यांना बसण्यासाठी एकही खुर्ची रिकामी नव्हती. व्यासपीठावर आदित्य ठाकरे यांच्या बाजूलाच बाळासाहेब थोरात बसले होते. पण राऊत यांना खुर्चीच नव्हती यामुळे ते व्यासपीठावरून खाली उतरण्याच्या तयारीत होते. आदित्य यांच्या हे लक्षात येताच त्यांनी राऊत यांना हात धरुन आपल्या खुर्चीत बसण्याचा आग्रह केला. हे सर्व सुरू असताना बाजूलाच बसलेले थोरात मात्र शांत होते. पण नंतर त्यांनीही राऊत यांना हाताला धरुन आदित्य यांच्या खुर्चीत बसवले. तर व्यासपीठावर खुर्चीच नसल्याने आदित्य मात्र उभे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -