घरताज्या घडामोडीपुन्हा एकदा '८३' आणि 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त टळला

पुन्हा एकदा ‘८३’ आणि ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त टळला

Subscribe

कोरोनामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला अडकलेले दोन मोठ्या चित्रपटांची सर्व प्रेक्षकांचा प्रतिक्षा आहे. यामधला पहिला मोठा चित्रपट म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा ‘८३’ आणि दुसरा चित्रपट अक्षय कुमार आणि कटरीना कॅफचा ‘सूर्यवंशी’. हे दोन्ही चित्रपट तयार आहेत. पण कोरोनामुळे हे चित्रपट प्रदर्शनापर्यंत पोहोचत नाही आहे. आता पुन्हा एकदा या चित्रपटांचा मुहूर्त टळला आहे. आता हे चित्रपट पुढच्या वर्षी २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहेत.

दरम्यान दोन्ही चित्रपटाचे निर्माते रिलायन्स एंटरटेनमेंट आहे. त्यांनी यावर्षी जुलै महिन्यात अशी घोषणा केली होती की, ”सूर्यवंशी’ आणि ‘८३’ चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातील. निर्माते चित्रपटगृह उघडण्याचे वाट पाहत होते. रोहित शेट्टीचा पोलिसांवर आधारित चित्रपट ‘सूर्यवंशी’ या दिवाळीत तर कबीर खानचा क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार होते.’ पण आता ऑक्टोबरनंतर आता असे सांगण्यात आले आहे की, सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

बंगळूरू मिररला दिलेल्या एका मुलाखतीत रिलायन्स एंटरटेनमेंटच्या ग्रुप सीईओ एस सरकारने सांगितले की, ‘चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. कबीर खानचा ‘८३’ चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होण्याची शक्यता कमी आहे. तसेच ‘सूर्यवंशी’ पण २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी त्यांनी कोरोनाची दुसऱ्या लाटेच कारण दिले आहे. त्यामुळे ‘८३’ चित्रपट जानेवारी आणि ‘सूर्यवंशी’ मार्चमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत.’


हेही वाचा – उर्वशीने ३७ कोटींचा घातला सोन्याचा ड्रेस, फोटो झाला व्हायरल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -