घरमुंबईरेल्वे आणि बस अपघातानंतर जुईनगरच्या समस्या चव्हाट्यावर

रेल्वे आणि बस अपघातानंतर जुईनगरच्या समस्या चव्हाट्यावर

Subscribe

निराकरणासाठी काँग्रेसचे निवेदन

जुईनगरमधील रेल्वे क्रॉसिंगवर गेल्या सप्ताहात रेल्वे आणि बसचा अपघात झाला. त्यानंतर या विभागातील अनेक समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. अशा सर्व समस्यांचे एकीकरण करून नवी मुंबई काँग्रेसने त्या सोडण्यासाठी मनपाला निवेदन दिले आहे.जुईनगर विभागामधील बर्‍याच गती रोधकांना पांढर्‍या रंगाचे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्यावेळी गतीरोधक असल्याचा अंदाज येत नाही. शक्यतो दुचाकी वाहनांना पांढर्‍या रंगाचे पट्टे नसल्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. ज्या गती रोधकांना पांढरे पट्टे मारलेले आहेत ते पुसट झालेले आहेत. असे साधारण २२ ठिकाणी पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सानपाडा रेल्वे कारशेड फाटक, सेक्टर २३ ते अमृता विद्यालय, सेक्टर २५ पर्यंत (स्टेशन रोड) सुलभ शौचालयाची कोठेही व्यवस्था नाही.

सेक्टर २३ गावदेवी मैदान येथे पालिका नवीन शौचालय बांधण्याची व्यवस्था करू शकतेे. कारण ह्या जागेशिवाय पालिकेकडे दुसरी कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध नाही. तसेच आजूबाजूच्या परिसरातील मुले या मैदानात खेळण्यासाठी येतात आणि या ठिकाणी भाजी मार्केट असल्या कारणाने नागरिकांची वर्दळही फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सेक्टर २३, जुईनगर या ठिकाणी नवीन शौचालयाची आवश्यकता आहे असे निवेदन नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेने २०१८ च्या स्वच्छ भारत अभियान या मोहिमेअंतर्गत ठीकठिकाणच्या रस्त्यावरील मोठमोठ्या कचर्‍याच्या कुंड्या काढून टाकल्या. ज्याच्यामुळे नवी मुंबई शहर स्वच्छ राहण्यास मदत झाली आणि आपल्या महानगरपालिकेला मानांकन मिळाले. २०१९ साठीसुद्धा पुन्हा एकदा मानांकन मिळण्याचा हेतू लक्षात घेऊन जुईनगरमध्ये ठिकठिकाणी साधारण ३० ठिकाणी स्टीलचे ओला व सुका कचरा वर्गीकरण डबे बसवावेत, ज्यामुळे आपले नवी मुंबई शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -