घरमुंबईअजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दीड तास चर्चा रंगली

अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दीड तास चर्चा रंगली

Subscribe

मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे यांनी महाआघाडीत यायला हवे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. दादरमध्ये दोघांच्या एका मित्राच्या घरी दोघांमध्ये बैठक झाली. याबाबचे वृत्त न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिले आहे. मनसे अध्यक्ष राज राज ठाकरे यांनी महाआघाडीत यायला हवे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरेंनी आघाडीसोबत यावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार हे पूर्वी शिवसेना आणि मनसेच्या विरोधात भूमिका घेताना दिसायचे. मात्र त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आघाडीसोबत यावे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले होते. “राज ठाकरे यांनी २०१४ साली नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र आज ते मोदींबद्दल काय बोलतात, हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच मध्यंतरी त्यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला देखील हजेरी लावली होती. राज ठाकरेंची भूमिका आता बदलली आहे, तसेच मनसेसोबत ठराविक मतांचा पाठिंबा नक्कीच आहे. त्यामुळे ते आघाडीत असतील तर फायदाच होईल”, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

राज ठाकरे आमच्यासोबत येतील असे नाही

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘राज ठाकरे हे आमच्यासोबत आता जरी दिसत असले तरी आगामी काळात आमच्यासोबत येतील असं दिसतं नाही’ असे सांगितले होते. त्यानंतर अजित पवारांचे राज ठाकरेंनी आघआडीसोबत यावेचे वक्तव्य आणि आता त्यांनी राज ठाकरेंची घेतलेली भेट यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -