घरमुंबईतीनवेळा सिग्नल तोडल्यानंतर रेल्वेला जाग

तीनवेळा सिग्नल तोडल्यानंतर रेल्वेला जाग

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर चार आठवड्यामध्ये लोकल ट्रेनने सिग्नल तोडल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनांनंतर मध्य रेल्वे प्रशासनाला आता जाग आली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनमधील मोटरमनच्या केबिनमध्ये अलार्म यंत्रणा बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या अलार्म यंत्रणेद्वारे रेड सिंग्नल पडण्याच्या आधी मोटरमनला अलार्म देऊन गाडी थांबवण्याचे संकेत दिले जाणार आहेत.

रेड सिग्नल पडण्याआधी दिला जाणार अलार्म –

- Advertisement -

रेड सिग्नल पडण्याआधी लोकल ट्रेन फास्ट असेल तर अशावेळी दोन वेळा अलार्म दिला जाईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. तरिही मोटरमनने जर सिग्नल मोडला तर तो गंभीर गुन्हा समजला जाईल. एकाच ट्रॅकवर दोन लोकल ट्रेन असतात त्यावेळी रेड सिग्नल दिला जातो. जर सिग्नल मोडला तर लोकल ट्रेनमध्ये टक्कर होण्याची शक्यता असते. अशावेळी रेल्वे वेळापत्रक तर कोलमडतेच पण मोठा अपघात होण्याचीही शक्यता असते. सिग्नल मोडल्यास त्या मार्गावरील रेल्वेंना २० मिनिटे उशीराने धावतात अशी माहिती रेल्वे अधिकारी यांनी दिली आहे.

रेल्वे प्रशासनाची मंजूरी –

- Advertisement -

मोटरमनच्या केबिनमध्ये अलार्म यंत्रणा बसवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे प्रशासनाने सोमवारी मंजूरी दिली. या प्रस्तावाअंतर्गत, हा अलार्म ट्रेनच्या सहाय्यक चेतावणी प्रणालीद्वारे कार्य करेल. रेड सिग्नल पडण्याआधी फास्ट आलेली लोकल ट्रेनला जर अलार्म दिला असेल तर मोटरमनने ट्रेनचा वेग १० किलो मीटरच्या आधी कमी करण्याची सूचना केली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. अलार्म यंत्रणेमुळे सिग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

सिग्नल तोडण्याच्या तीन घटना – 

लोकल ट्रेनमध्ये आधीपासूनच सहाय्यक चेतावणी यंत्रणा आहे. लोकल ट्रेनमध्ये टक्कर होऊ नये यासाठी ही सहाय्यक चेतावणी यंत्रणा याआधी बसवण्यात आली होती. रेल्वेच्या व्याख्येनुसार जर लोकल ट्रेनने सिग्नल तोडला असेल तर धोक्याची पातळी ओलांडली असा अर्थ होतो. जर एखाद्या मोटारमनकडून सिग्नल तोडला गेला तर त्या मोटारमनचे काम थांबवले जाते आणि तपास सुरु केला जातो. सिग्नल मोडल्यावर कठोर दंड दिला जात असला तरी सिग्नल तोडल्याची अनेक प्रकरणे मध्य रेल्वे मार्गावर नोंदवण्यात आली असल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -