घरमुंबईकल्याण-डोंबिवलीत गावठी दारू विक्री तेजीत; ३७ ठिकाणी पोलिसांची कारवाई

कल्याण-डोंबिवलीत गावठी दारू विक्री तेजीत; ३७ ठिकाणी पोलिसांची कारवाई

Subscribe

गावठी दारु विक्रि करणाऱ्या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्याचप्रमाणे मोठा दारुसाठा आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैधपणे सुरू असलेल्या हातभट्टी गावठी दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार कारवाईची मोहीम राबवली जात आहे. गेल्या १५ दिवसात कल्याण डोंबिवली शहरात गावठी दारू विक्री करणा-या तब्बल ३७ ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. दारू विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून या कारवाईत सुमारे ५० हजार रूपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. शहरात गावठी दारू विक्री इतक्या मोठया प्रमाणात होत असल्याचे उजेडात आल आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही ग्रामीण परिसरातील हातभट्टया उध्दवस्त करून तब्बल ३ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याठिकाणी पोलिसांनी केली कारवाई

कल्याण पोलीस परिमंडळ -३ च्या हद्दीत एकूण आठ पोलीस स्टेशन येतात. या आठही पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. कल्याणमधील कोळसेवाडी, तिसगाव, काटेमानिवली, खडकपाडा, मिलींदनगर सुचकनाका, पिसवली, बारावे, वायलेनगर, मोहने, आनंदवाडी तर, डोंबिवलीत पंचायतबावडी ठाकुर्ली, कचोरेगाव, निळजेगाव, आयरे, गोळवली, देसलेपाडा कोपर रेल्वे स्टेशनजवळ, त्रिमुर्तीनगर वसाहत, सागाव या परिसरात हातभट्टीची गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्रात दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

दारुसाठा आणि साहित्य जप्त

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पेालिसांनी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई सुरूवात केली होती. गेल्या १५ दिवसात पेालिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवली शहरातील हातभट्टी गावठी दारू विक्री जोरदारपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत हातभट्टीच्या दारू विक्रेत्यावर पोलिसांकडून एवढया मोठया प्रमाणात कारवाई झाली नव्हती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मोठी कारवाई समजली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभाग डोंबिवली व कल्याण यांनी वेगवेगळया कारवायांमध्ये सुमारे ३ लाख अवैध मद्यसाठा आणि ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सामुग्रीही नष्ट करण्यात आली आहे. हेदुटने गावात छापा टाकून ६ हजार रसायन असा एकूण १ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल तर चिंचपाडा गाव व मणेरा गाव येथे छापा टाकून गावठी दारूचे अड्डे उध्दवस्त केले यात कारवाईत सुमारे दीड लाखाचे साहित्य जप्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -