घरदेश-विदेशBREAKING: सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता

BREAKING: सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता

Subscribe

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पुराव्याअभावी या आरोपींची मुक्तता करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

१३ वर्षांपूर्वी झालेल्या सोहराबुद्दीन शेख आणि प्रजापती यांच्या एनकाऊंटर प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. या प्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.या प्रकरणात २२ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. पण आता या सगळ्यांची सुटका झाली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पुराव्याअभावी या आरोपींची मुक्तता करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तुलसीराम प्रजापती यांचे अपहरण झाले हे कोर्टात सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे या आरोपींची सुटका करण्यात आली आहे. तब्बल १३ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

- Advertisement -

साक्षीदार झाले फितूर

इनकाँऊटर प्रकरणातील कोणतेही आरोप हे कोर्टात सिद्ध होऊ शकलेले नाहीत.  पुराव्याअभावी हा निकाल कोर्टाने लावत आरोपींची यातून मुक्तता केली आहे. शिवाय या प्रकरणातील साक्षीदारच फितूर झाल्याने कोर्टासमोर काहीच सिद्ध होऊ शकलेले नाही. शिवाय सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यास अपयशी ठरल्याचे देखील कोर्टाने म्हटले आहे.

वाचा संपूर्ण प्रकरण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -