घरमुंबईआता रेल्वे स्थानकांवरून 'घ्या' अ‍ॅमेझॉनचे पार्सल; कंपनीचा रेल्वेशी करार 

आता रेल्वे स्थानकांवरून ‘घ्या’ अ‍ॅमेझॉनचे पार्सल; कंपनीचा रेल्वेशी करार 

Subscribe

ऑनलाईन शॉपिंगचे क्रेज दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या ऑनलाईन शॉपिंग करण्याऱ्या ग्राहकांना वेळेत सुविधा मिळावी यासाठी आता देशाच्या सुप्रसिध्द ऑनलॉईन शॉपिंग कंपनी अ‍ॅमेझॉनसोबत मध्य रेल्वेने करार केला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकात या अ‍ॅमेझॉन ऑनलॉईन शॉपिंग कंपनीचे पिक पॉईंट उभारण्यात येणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या महसूलात मोठी भर पडणार आहे.

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्येला या ऑनलाईश शॉपिंग कंपन्यांना सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे वेळेत ग्राहकांपर्यंत शॉपिंगचे सामान पोहोचत नाही. पर्यायी या शॉपिंग कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे देशाची एक सुप्रसिध्द ऑनलाईन शॉपिग कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने मुंबई आणि उपनगरातील रेल्वे स्थांकावर पिक पॉईंट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेशी ३ महिन्यांसाठी प्रायोगिकतत्वावर हा करारसुध्दा करण्यात आला आहेत. या करारात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर पिक पॉईंट उभारण्यात येणार आहे. यातून मध्य रेल्वेला एकूण ६ लाख रूपयांचा महसूल मिळणार आहे. हा करार फक्त प्रायोगिकतत्वार करण्यात आला आहे.

- Advertisement -

मात्र, हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात यशस्वी झाल्यानंतर ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे पिक पॉईंट वाढवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय रेल्वेत महसूल वाढवण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रिव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढवण्यासाठी अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक योजना म्हणजे रेल्वे स्थानकावर ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे पिक पॉईंट उभारणी ही आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्य रेल्वेच्या महसूलात काही प्रमाणात का होईना भर पडणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -