घरताज्या घडामोडीनारायण राणेंवर दिल्ली खुश,अमित शहा लवकरच कोकणात

नारायण राणेंवर दिल्ली खुश,अमित शहा लवकरच कोकणात

Subscribe

खासदार नारायण राणे यांच्यावर भाजपाचे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व भलतेच खुश आहे. याचपार्श्वभूमीवर शाह ६ फेब्रुवारीला राणे यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांबरोबरच शिवसेनेवर सातत्याने तोंडसुख घेणारे कोकणातील आक्रमक नेते खासदार नारायण राणे यांच्यावर भाजपाचे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व भलतेच खुश आहे. याचपार्श्वभूमीवर शाह ६ फेब्रुवारीला राणे यांच्या सिंधुदुर्गातील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नारायण राणे यांच्या पाठबळामुळे भाजपाच्या ५५ ग्रामपंचायती ताब्यात आल्या. त्यामुळे आतापर्यंत शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या कोकणात भाजपला हात पाय पसरवण्याची नामी संधी मिळाली आहे. यामुळे नारायण राणेंच्या या कामगिरीवर दिल्ली खुश झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारने नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. त्यानंतर. गृहमंत्री अमित शहा यांनी राणे यांची भेट घेऊन त्यांना केंद्र सरकारकडून १० केंद्रीय सुरक्षा बलाचे सशत्र कमांडोंचे संरक्षण दिले. तसेच राणेंच्या चिरंजिवाला प्रदेश भाजपामध्ये सचिव पद बहाल करण्यात आले. त्यापाठोपाठ राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडीकल कॉलेजलाही केंद्राने मान्यता दिली. त्याचे उद्घाटन करण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोकणात येत आहेत. त्यामुळे भाजपातील नारायण राणेंचे वजन वाढले आहे.

- Advertisement -

कोकणातील शिवसेना आमदार अस्वस्थ

मात्र एकीकडे राणेंचे प्रस्थ कोकणात आणि भाजपात वाढत असतांना दुसरीकडे शिवसेना आमदार मात्र अस्वस्थ झाले आहेत. २०१९ साली झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने राणेंचे वारु थोपवून धरले होते.मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या दिपक केसरकर यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला व रत्नागिरीचे आमदार उद्य सामंत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तर मातोश्रीच्या मर्जीतील परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांना रत्नागिरीचे पालकमंत्री करण्यात आले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान मिळू न शकल्याची खंत सावंतवाडीचे शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी यापूर्वी उघडपणे व्यक्त केली होती.

- Advertisement -

मात्र त्यानंतरही सेना नेतृत्वाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिकांची गळचेपी सुरुच असल्याची भावना येथिल कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकीकडे शिवसेनेचे कट्टर राजकीय हाडवैर असलेल्या नाराण राणेंना भाजपा प्रस्थापित करत असतांना दुसरीकडे सेना नेतृत्वाकडून मात्र शिवसैनिकांच्या अपेक्षांना हरताळ फासला जात असल्याची व सत्तेचे पाठबळ दिले जात नसल्याची भावना येथे जोर धरु लागली आहे. भक्कम पाठबळ दिल्याने व त्याप्रमाणात शिवसेना नेतृत्वाकडून कोकणातील नेत्यांची मात्र तुलनेने हेळसांड होत असल्याने कोकणातील विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना आमदार अस्वस्थ झाले आहेत. ही नाराजी लवकरच मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात येणार असल्याची चर्चा शिवसेना गोटात आहे.


हेही वाचा – राममंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये; केशव उपाध्ये यांचा टोला

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -