घरमुंबईपवार-ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीमध्ये गुप्तगू!

पवार-ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीमध्ये गुप्तगू!

Subscribe

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आज बाळासाहेब ठाकरेेचे नातू अमित राज ठाकरे यांची आज भेट घेतली असून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दोघांमध्ये सव्वातास चर्चा झाली आहे. मात्र, ही चर्चा कोणत्या विषयावर झाली हे कळू शकलेले नाही.

पवार आणि ठाकरे कुटुंबातील नाते आणि राजकीय भेटीगाठी महाराष्ट्राला काही नव्या नाहीत. मात्र, आता ठाकरे आणि पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीमध्ये देखील भेटीगाठीचा योग आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अमित राज ठाकरे यांची आज भेट घेतली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दोघांमध्ये सव्वातास चर्चा झाली असली तरी नेमकी ही चर्चा कोणत्या विषयावर झाली हे मात्र अजून कळू शकलेले नाही. मुंबईमध्ये फिनिक्स मिल कंपाऊंड मधील इंडिगो हॉटेलमध्ये आज दोघांनी दुपारी १:३० च्या सुमारास भेट घेत एकत्र जेवण देखील केले. दरम्यान आज सकाळीच रोहित पवार यांनी अमित ठाकरे यांची फोनकरून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार या दोघांमध्ये भेट झाल्याचे बोलले जात आहे.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जवळीक झाल्याचे पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, तर राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका करत राष्ट्रवादीला जणू पाठींबाचा दिल्याचे पहायला मिळाले होते. त्यातच याआधी अजित पवार, तसेच शरद पवार यांची राज ठाकरेंनी घेतलेली भेट यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मनसेला सोबत घेणार, अशी चर्चा रंगलेली असताना आज अमित आणि रोहित ठाकरे या दोन युवा नेत्यांनी एकमेकांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

- Advertisement -

रोहित पवार आणि अमित ठाकरे यांच्याबद्दल थोडक्यात

रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू असून, ते जिल्हा परिषद सदस्या देखील आहे. तसेच रोहित पवार सध्या राजकारणात सक्रिय असून, आजोबा शरद पवार यांच्यासोबत ते प्रत्येक कार्यक्रमात पहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, त्यांनी त्या दृष्टीने काम देखील करायला सुरुवात केली आहे. तर अमित ठाकरे हे राज ठाकरे यांचे चिरंजीव असून, ते सध्या राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत दिसतात. तसेच ते सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रीय आहेत. विशेष बाब म्हणजे अमित ठाकरे यांच्याबद्दल तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.


हेही वाचा – लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या – राज ठाकरे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -