घरमहाराष्ट्रलोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या - राज ठाकरे

लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या – राज ठाकरे

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: कामाला लागले असून, दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे भर द्या, असे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: कामाला लागले असून, दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे भर द्या, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत अनेक सुचना देखील केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवस पुण्यामधील अशोक नगरमध्ये मतदारसंघ निहाय बैठका घेत या बैठकांमध्ये त्यांनी पक्ष वाढीसाठी काय करता येईल, विधानसभेची तयारी कुठपर्यंत आली हे जाणून घेत मार्गदर्शन केले.

तरुण, वृद्ध, आणि महिलांपर्यंत पोहोचा

दरम्यान यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारसंघातील तरुणांच्या, वृद्धांच्या आणि महिला तसेच इतर वर्गाच्या समस्या जाणून घ्या आणि त्यानुसार आवाज उठवा वेळ प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी करा पण लोकांचे प्रश्न सोडवा‘, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. विशेष बाब म्हणजे सरकारच्या योजना जर लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर तर त्याची पोलखोल करा असे आदेश देखील कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनी दिल्याचे समजते.

- Advertisement -

पक्षांतर्गत वाद मिटवा

या दोन दिवसाच्या संपूर्ण दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेवटच्या कार्यकर्त्यांचे देखील म्हणने ऐकून घेत पक्षात जर एकमेकांबद्दल काही हेवेदावे असतील तर ते इथेच मिटवा आणि पक्षवाढीसाठी तसचे लोकांच्या हितासाठी एकत्र या, असे आदेश देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिले. एवढंच नाही तर पक्षाच्या अजेंड्यावर काय प्रश्न असावेत याचे मार्गदर्शन देखील राज ठाकरे यांनी यावेळी केले.


हेही वाचा – राज ठाकरेंना विधानसभेसाठी मोठी संधी – प्रकाश आंबेडकर

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंचा पुणे दौरा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -