घरमुंबईरेल्वे प्रवाशांचे महागडे फोन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

रेल्वे प्रवाशांचे महागडे फोन चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

Subscribe

रेल्वे प्रवाशांचे महागडे फोन चोरणाऱ्या एका चोरट्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या चोरट्याकडून सुमारे दिड लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. फिरोज हनीफ शेख उर्फ सम्राट (३१) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोराचे नाव आहे. नालासोपारा येथे राहणाऱ्या या चोरट्यावर मुंबई रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईतील रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरीला जात असल्याचा घटना मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस उपायुक्त पुरषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करण्यात आले.
दरम्यान अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी यांनी पोलीस उपनिरीक्षक रमेश संकपाळ यांचे पथक तयार केले होते. या पथकाने अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात गस्त वाढवली असताना अंधेरी पश्चिम तिकीट खिडकी जवळ एक इसम संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन मोबाईल सापडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली.

- Advertisement -

अंधेरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयांचे महागडे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या हनीफ शेख याच्याविरुद्ध कुर्ला, सीएसटीएम, दादर, मुंबई सेंटर, बोरिवली, वांद्रे आणि अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश संकपाळ आणि पथक करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -