घरमुंबईचोरीच्या गाड्या ऑनलाईन विकणारा तरुण गजाआड

चोरीच्या गाड्या ऑनलाईन विकणारा तरुण गजाआड

Subscribe

आईच्या आजाराचे कारण द्यायचा आणि मौजमजा करायचा

स्वतःच्या मौजमजेसाठी आई आजारी असल्याचे कारण पुढे करून चोरीची दुचाकी ‘ओएलएक्स’ या वेबसाईटवर विक्री करणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवघर पोलिसांनी केली असून त्याच्याकडून ४ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. मनीष अमित नाईक (२१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मनिष हा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण आहे.

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मनिषला तांत्रिकज्ञान चांगल्या प्रकारे आहे. काही कामधंदा न करता तो घरात सतत संगणकावर असायचा, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक वेबसाईटवर काही ना काही शोधणार्‍या मनिषला ‘ओएलएक्स’ या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूबाबत आकर्षक निर्माण झाले होते. त्यातच त्याला एक युक्ती सुचली, त्याने राहत असलेल्या परिसरातून तीन महिन्यांपूर्वी ‘एक्टिव्हा’ ही दुचाकी चोरी करून या दुचाकींचे संगणकावरच बनावट कागदपत्रे तयार केले आणि ती विकण्यासाठी ‘ओएलएक्स’ या वेबसाईटवरची मदत घेतली.

- Advertisement -

दुचाकी विकत घेणार्‍यांना तो आई आजारी असून तिच्या औषधांचा खर्च खूप असून त्यासाठी ही दुचाकी विकत असल्याचे सांगायचा. या प्रकारे त्याने मागील तीन महिन्यात चार दुचाकी चोरी करून त्या ओएलएक्स या वेबसाईटवर वर टाकून त्यांची विक्री करू लागला होता. त्यातून येणार्‍या पैशातून मनिष मौजमजा करीत होता. मागील तीन महिन्यात नवघर पोलीस ठाण्यात चार दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, या चोरीचा तपास सुरू होता.

एका व्यक्तीने ओएलएक्सवर अर्ध्या किमतीत घेतलेली दुचाकीचे कागदपत्रे बोगस असल्याची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी तांत्रिकरित्या तपास करून मनिषला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नवघर पोलिसांनी या प्रकरणी मनिष नाईक या तरुणाला अटक करून त्याच्याविरुद्ध चोरी, बोगस कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -