घरमुंबईसलमानला मिळाली जीवे मारण्याची धमकी

सलमानला मिळाली जीवे मारण्याची धमकी

Subscribe

बॉलिवूडचा दबंग खान सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी न मिळाल्याने तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

बॉलिवूडचा दंबग खान म्हणजेच सलमान हा नेहेमीच चर्चेत असतो. सलमानच्या रागामुळे घडलेले किस्से तर अजूनही चर्चेत आहे. बॉलिवूडच्या अशा कलाकाराला नुकतेच एका तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शाहरूख गुलाबनी उर्फे शेरा असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाला उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे. सलमानने आपल्याही चित्रपटांमध्ये घ्याव अशी त्याची इच्छा होती. शेराने काही दिवसांपूर्वीच सलमानच्या खाजगी मोबाईल नंबरची मागणी केली होती. ही मागणी सलमानच्या सहायकाला ही मागणी करण्यात आली. सहायकाने नंबर न दिल्यामुळे शाहरूखने शिवीगाळ केली व सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र त्याने अखेर सलमानचे वडिल सलिम खान यांचा नंबर मिळवला. सलिम खान यांना फोन करून त्याने सलमानचा नंबर मागितला मात्र त्यांनीही नंबर देण्यासाठी नकार दिला. त्यावेळी या तरुणाने त्यांनाही धमकी दिली.

 

View this post on Instagram

 

This is how I am preparing for Bigg Boss season 12 #BB12

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

छोटा शकीलच्या टोळीतील गुंड असल्याची बतावणी

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सलमानच्या सहायकाला मोबाईल नंबरची मागणी केल्यानंतर त्याने नकार दिल्याने या तरुणाने रागात त्याला शिवीगाळ केली. यानंतर सलमानला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. आपण छोटा शकीलच्या टोळीतील गुंड असल्याचे त्याने सांगितले. यानंतर सलमानचे वडिल सलिम खान यांचा नंबर मिळवून त्याने सलमानचा नंबर मागितला. सलमानचा नंबर दिला नाही तर त्याला जीवे मारणार असे ही त्याने सांगितले. याघटनेची तक्रार वांद्रे पोलिसांकडे करण्यात आली. पोलिसांनी या फोनची लोकेशन ट्रेस करून अलाहाबाद येथून अटक करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -