घरमुंबईमुख्यमंत्र्यांच्या राहुल गांधिगीरीचा जनता समाचार घेईल - अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांच्या राहुल गांधिगीरीचा जनता समाचार घेईल – अतुल भातखळकर

Subscribe

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे

विधासभा अधिवेशनात विरोधकांनी केलेल्या टीकांना आणि प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळी विरोधकांनी केलेल्या टीकांवर मुख्यमंत्र्यांनी चौफेर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या प्रश्नांपासून ते दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरही यामध्ये भाष्य केले आहे. शेतकरी आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री यांनी म्हटले की शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे अशा वक्तव्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला त्यामुळे विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचे राहुल गांधी म्हणून संबोधले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी भारतीय जवानांचा अपमान केला आहे त्यामुळे जवानांची माफी मागावी अशी मागणीही भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे असे निलाजरे वक्तव्य करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत राज्यातील जनता राहुल गांधिगीरीचा समाचार घेईलच असे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, राज्य सरकार हे दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलकांच्या सोबत आहेत. दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलक येऊ नये यासाठी केंद्र सरकारने राजधानीच्या रस्त्यावर खिळे ठोकले आणि तारांचे कुंपण केले. जे तारांचे कुंपण चीनविरोधात देशाच्या सीमेवर टाकले पाहिजे ते दिल्लीच्या रस्त्यावर टाकले. या सरकराने चीनसमोरुन पळ काढला आहे. शेतऱ्यांच्या मार्गाव खिळे आणि चीन दिसला की पळे असे म्हटले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -