घरमनोरंजनश्रेया घोषालने दिली 'गूड न्यूज', बेबी बंप सोबतचा फोटो केला शेअर

श्रेया घोषालने दिली ‘गूड न्यूज’, बेबी बंप सोबतचा फोटो केला शेअर

Subscribe

श्रेया घोषाल ही आई होणार असून तिच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. यासंबंधी पोस्ट शेअर करुन तिने तिच्या गूड न्यूज ची बातमी सगळ्यांना दिली आहे.

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. श्रेया ही आई होणार असून तिच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर तिच्या बेबी बंप सोबतचा फोटो शेअर करुन श्रेयाने चाहत्यांबरोबर ही गूड न्यूज शेअर केली आहे. ”बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय. आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत, त्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे.” अशी पोस्ट लिहित श्रेयाने आनंद व्यक्त केला आहे. श्रेयाच्या या पोस्टवर चाहत्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

२०१५ मध्ये श्रेया घोषाल प्रियकर शिलादित्यासोबत विवाहबंधनात अडकली होती. दूरदर्शनवरील ‘सा रे ग म प’ या गायनस्पर्धेत श्रेया विजेती झाली होती. त्यानंतर तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. देवदास या चित्रपटात तिने पहिल्यांदा पाश्वगायन केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रेयाने आजवर जवळपास १४ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. वयाच्या चोथ्या वर्षापासून श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. पार्श्वगायनासोबतच ती काही रिअॅलिटी शोज मध्येही परीक्षक म्हणून दिसली आहे.

- Advertisement -

हे वाचा- काय सांगता ? ‘हिरोपंती २’चं पोस्टर केलं कॉपी !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -