घरमुंबईमुंबईकर दुषित हवेच्या विळख्यात

मुंबईकर दुषित हवेच्या विळख्यात

Subscribe

चौथ्या दिवशी मुंबईकरांना दूषित हवेचा फटका

नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यात मुंबईकरांना थंडीची चाहूल लागते. सकाळी आणि संध्याकाळी तसे वातावरण ही मुंबईकर अनुभवत आहेत. पण, गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा प्रदूषित झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुपारी मुंबईतील वातावरण बदलून अचानक ढगाळ, धुळीकण आणि धुरकेसदृश्य निर्माण झाले होते. त्यानंतर अचानक पाऊस पडायला लागला. काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाने ठाण मांडले असताना सलग चौथ्या दिवशीही हवेच्या गुणवत्तेने वाईट शेऱ्याचीही पातळी ओलांडली. ‘सफर’ या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणालीने हा अहवाल दिला आहे. गुरुवारी मुंबईतील अनेक ठिकाणांच्या हवेची नोंद अतिशय वाईट करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईचा लोकल प्रवास महागणार?

- Advertisement -

मुंबई या संपूर्ण शहराची हवा वाईट असल्याची नोंद सफर प्रणालीने केली आहे. तर, शहरातील बीकेसी म्हणजेच वांद्रे-संकुल या परिसरात अतिशय वाईट दर्जाची हवा गेल्या चार दिवसांपासून आहे. परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३१३ ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) एवढा नोंदवण्यात आला आहे. तर, भांडुपमध्ये मध्यम दर्जाची हवा होती. ऐ.क्यू.आय (एअर क्वॉलिटी इंडेक्स) १२० एवढा हवेचा निर्देशांक होता. कुलाब्यात मध्यम स्वरुपाच्या १६४ ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) हवेचा निर्देशांक नोंद करण्यात आला. माझगाव, अंधेरी या परिसरात अतिशय वाईट दर्जाची हवा असून अनुक्रमे ३१५ आणि ३०३ ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) एवढा नोंदवण्यात आला आहे. वरळी, बोरीवली आणि चेंबूरमध्ये अनुक्रमे २५८, २०९ आणि २०५ असा ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) हवेचा निर्देशांक नोंद करण्यात आला आहे. तर, नवी मुंबईत मध्यम स्वरुपाची हवा नोंद करण्यात आली असून १५४ ऐ.क्यू.आय(एअर क्वॉलिटी इंडेक्स) एवढा निर्देशांक नोंद करण्यात आला आहे.

बीकेसीतील हवा अतिशय वाईट

मुंबई उपनगराच्या अनेक परिसरातील हवा ही गुरुवारी वाईट दर्जाची असल्याची नोंद सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणालीने केली आहे. तर, फक्त बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला संकुल या परिसरातील हवा या वातावरणातही अतिशय वाईट नोंदवण्यात आली आहे. या परिसरात वातावरण सर्वांधिक प्रदूषित नोंदवण्यात आलं असून हवेची गुणवत्ताही खालावली. कमी तापमानामुळे प्रदूषक पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळपास अडकतात. यामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होते, असेही सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -