घरमुंबईआधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यास नकार

आधार कार्ड नसल्याने बँक खाते उघडण्यास नकार

Subscribe

येस बँकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई : आधार कार्ड नसल्याने खाते उघडण्यास नकार देणार्‍या येस बँकेच्या विरोधात एका खासगी कंपनीने थेट हायकोर्टात याचिका दाखल करून १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची गरज नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. असे असताना येस बँकेने ही भूमिका घेतली आहे. त्याचा फटका बँकेला बसण्याची शक्यता आहे.

मायक्रो फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अ‍ॅड. नियम भसीन यांच्यामार्फत नरिमन पॉइंट येथील येस बँक शाखेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. या बँकेने खाते उघडण्यास नकार दिल्याने आपल्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून बँकेला दहा लाख रुपये आपल्याला देण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

- Advertisement -

आधारसक्तीबाबत निर्देश स्पष्ट असतानाही ते पाळले गेले नाहीत. या निर्देशांची बँकेला लेखी स्वरुपात माहिती देऊनही बँकेने या पत्रव्यवहारास कोणतेही उत्तर न देता केराची टोपली दाखवली, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -