घरमुंबईअ‍ॅप ‘रिअल टाईम’ वर येवू दे

अ‍ॅप ‘रिअल टाईम’ वर येवू दे

Subscribe

बेस्टच्या अ‍ॅप अनावरणाला सदस्यांचा विरोध

31च्या प्रवाशांना रिअल टाईम लोकेशनची माहिती देणारे बेस्ट उपक्रमाचे अ‍ॅप अर्धवट माहितीच्या आधारावर लाँच करण्याचा बेस्ट उपक्रमाचा मनसुबा आज बेस्ट समिती सदस्यांनी मोडीत काढला. बेस्ट उपक्रमाने प्रवास करणारे लाखो प्रवासी पाहता रिअल टाईमचे फीचर अ‍ॅपमध्ये असावे अशा आग्रह बेस्ट समिती सदस्यांनी आजच्या समितीच्या बैठकीत कायम ठेवला आहे. त्यामुळे बेस्टचे बस ट्रॅकिंग अ‍ॅप लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत.

बेस्ट उपक्रमाकडून संपूर्ण मुंबईतील ६ हजार बस थांब्यांपैकी २०० ठिकाणी डिजिटल बोर्ड बसविण्यात येणार आहेत. या बोर्डवर बस येण्याची अपेक्षित वेळ दिसण्यासाठी मदत होईल. पण या अ‍ॅपमध्ये रिअल टाईम फिचरचा समावेश करण्यात आलेला नाही. रस्त्यावरील गर्दीचा अंदाज घेणारी यंत्रणा नसल्याने प्रवाशांना बस येण्यासाठीचा अंदाजित कालावधी मिळण्यासाठी अडचण येणार आहे. त्यामुळे रिअल टाईम यंत्रणेसह हे अ‍ॅप लाँच करावे अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली आहे. मुंबई शहरातील संपूर्ण ट्राफिकच्या अपडेट्ससाठी गुगल डेटा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दिवसात बेस्ट गुगलसोबत करारही करणार आहे. पण करार झाल्याशिवाय अ‍ॅप प्रवाशांसमोर नेण्यात येऊ नये अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी आज केली.

- Advertisement -

अ‍ॅपला नाव द्या
बेस्ठ उपक्रमामार्फत लाँच होणार्‍या नवीन अ‍ॅपसाठी नाव द्यावे, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना केले आहे. अ‍ॅपसाठी काय नाव देता येईल ही माहिती द्यावी, असेही आवाहन उपक्रमाने केले आहे. उत्तम नाव सुचवणार्‍याला बेस्टकडून पारितोषिकही देण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या [email protected] या ईमेल आयडीवर हे नाव सुचवण्याचे आवाहन उपक्रमाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -