घरमुंबईरुग्णवाहिका सेवेचा धंदा !

रुग्णवाहिका सेवेचा धंदा !

Subscribe

रुग्णांकडून भरमसाठ शुल्क

येथील नगर परिषदेकडेे रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्यासारखे प्रकार घडल्यामुळे जनता संतप्त झाली होती. हे लक्षात घेऊन मावळच्या खासदारांनी तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर माथेरानकरांना खासदार निधीतून नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र नगर परिषदेने सर्वसामान्य रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रुग्णवाहिका शुल्क आकारण्यास सुरूवात केली. त्यामुळे ही रुग्णवाहिका पैसे उकळण्याचे साधन झाल्याचे सध्या दिसत आहे.

रुग्णाला तातडीने उपचार मिळण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या रुग्णवाहिकेचा दर अवघ्या २ ते ३ किलोमीटर अंतराकरिता ६०० रुपये असा अवाजवी दर आकारला जात आहे. तसेच मुख्याधिकारी, डॉक्टर, तसेच बड्या नेत्यांना फोन केल्यानंतरच ही सेवा उपलब्ध होत असते. या प्रकारामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात रुग्ण दगावल्यास त्याला जबाबदार कोण, तसेच रुग्णवाहिकेच्या दर आकारणी संदर्भात स्थानिक नेते गप्प का बसलेत, असा सवाल जनता उपस्थित करीत आहे.

- Advertisement -

रुग्णवाहिकेसाठी आम्हा जेष्ठ नागरिकांना मुख्याधिकारी, डॉक्टर, तसेच इतर अनेकांना फोन लावावे लागतात. रुग्णवाहिकेचा दर सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखा नाही.
-चतुराबाई कांबळे, ज्येष्ठ नागरिक

माझ्या पतीचे हृदय फक्त ३५ टक्के चालत असून, त्यांना जास्त चालण्याने त्रास होत असल्यामुळे उपचाराकरिता नेण्यासाठी महिन्यातून दोन वेळा रुग्णवाहिकेची गरज लागते.
अशा परीस्थितीत रुग्णवाहिकेचे जास्त शुल्क आकारणे ही नागरिकांची निव्वळ लूट आहे.
-हमिदा मुजावर, गृहिणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -