घरमहाराष्ट्रपुणेभाजपला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार; एकनाथ पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश

भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार; एकनाथ पवार यांचा ठाकरे गटात प्रवेश

Subscribe

गेल्या काही दिवसांपूर्वीच पवार यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगली होती.

मुंबई : भाजपचे पिंपरी चिंचवड शहरातील नेते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (25 ऑक्टोबर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाने पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (BJP lost in Pimpri Chinchwad Eknath Pawars entry into the Thackeray group)

गेल्या काही दिवसांपूर्वीच पवार यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगली होती. अखेर ठाकरे गटाने एकनाथ पवार यांना गळाला लावले. पवार हे पिंपरी- चिंचवड महापालिकेचे नगरसेवक होते. तसेच त्यांच्यावर भाजप प्रवक्तेपद आणि शहरप्रमुख म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पिंपरी- चिंचवडमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून एकनाथ पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ पवार यांच्यावर पक्षाच्या संघटकपदाची जबाबदारी सोपवली.

- Advertisement -

हेही वाचा : विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेलचे सर्वात वेगवान शतक; दक्षिण अफ्रिकेच्या ‘या’ प्लेअरचा मोडला विक्रम

प्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले- असे काम करा

भाजपने आपल्या पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण केले. तसेच माझ्याकडे काहीही नसताना एकनाथ पवार माझ्याकडे आले आहेत. त्यांना मी काहीही देऊ शकत नाही. मात्र एकनाथ पवार यांनी जशी पिंपरी चिंचवड आणि नांदेड जिल्ह्यात काम केले. तसेच काम महाराष्ट्रभर करावे असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्यानंतर मी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे पिंपरी- चिंचवड बरोबरच नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघात शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : दिव्यांग वधूला त्रास देणाऱ्याला दणका; मंत्रालयातील विवाह नोंदणी अधिकारी निलंबित

गडकरींचे निकटवर्तीय एकनाथ पवार

दरम्यान, एकनाथ पवार हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते. तसेच ते नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांचा वाढता हस्तक्षेप तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षपदी डावलल्यामुळे निर्माण झालेली नाराजी, त्यांना डावलून उमा खापरे यांना दिलेली विधानपरिषदेची संधी या कारणांमुळे एकनाथ पवार यांनी भाजप सोडल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -