घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर का? अजित पवार गटातील नेत्याने सांगितलं कारण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर का? अजित पवार गटातील नेत्याने सांगितलं कारण

Subscribe

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार आहेत. परंतु एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कोणत्या मुद्द्यावर अमित शाहा यांची भेट घेणार यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं आहे. (Why Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis on Delhi tour Ajit Pawar group leader praful patel said the reason)

हेही वाचा – Parbhani : मराठा आरक्षणामुळे ग्रामपंचायत निवडणूक रद्द होण्याच्या मार्गावर; काय आहे कारण?

- Advertisement -

भंडाऱ्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मार्ग काढण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले असावेत. राजकीय चर्चा, तीन पक्षांशी संबंधित काही बाबींवरील निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मंत्रिमंडळ विस्तारही रखडला आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही नेते दिल्लीला गेले असावेत, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण…

मराठा आरक्षणावर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही. उलट सगळे पक्ष, सत्ताधारी व विरोधक सांगत आहेत की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं होतं. ते उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द करण्यात आले. मराठा आरक्षणाबाबत न्यायिक मार्ग कसा काढायचा, ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आरक्षण द्यायचं की नाही, हा मुद्दा नाही आहे. आरक्षण लगेच देता येईल, मात्र ते न्यायालयात टिकलं नाही तर, समाजाची फसवणूक होता कामा नये, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी उपोषण पुढे सुरूच ठेवावे, पण त्यांनी…; जरांगे पाटलांकडून संभाजीराजेंची विनंती मान्य

महाराष्ट्रातील समस्या जाणून घेण्यासाठी चांगली संधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्र किती मोठा आहे, महाराष्ट्राचा व्याप किती मोठा आहे. महाराष्ट्रातील समस्या काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे एक चांगली संधी आहे, अशी संयमी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -