घरमुंबईUddhav Thackeray : भाजपाची हलाखीची परिस्थिती, त्यांना उमेदवारही...; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

Uddhav Thackeray : भाजपाची हलाखीची परिस्थिती, त्यांना उमेदवारही…; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

Subscribe

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत ईडीची कारवाई सुरू असलेले जोगेश्वरी मतदारसंघातील आमदार रवींद्र वायकर हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाजपावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, भाजपाची हलाखीची परिस्थिती, त्यांना उमेदवारही बाहेरून आणावा लागतो आहे. (BJPs dire situation they have to bring candidates from outside Criticism of Uddhav Thackeray)

हेही वाचा – Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंसारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम शिंदेंनी केलं – रामदास कदम

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईमध्ये आणि राज्यभर फिरतोय, हे पाहण्यासाठी की तुम्ही जागे आहात की नाही. कारण आपल्याला हुकूमशाही गाडायची आहे. ज्या पद्धतीने भाडोत्री जनता पक्ष म्हणजे भाजपा. हे मी एवढ्यासाठी बोलतोय कारण त्यांच्याकडे ओरिजनल नेते राहिलेलेच नाही आहेत. ते भलेही म्हणो तितके पार आणि तितके पार, पण या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे लावले आहेत. आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की, त्यांना उमेदवारही बाहेरून आणायला लागत आहेत.

भारतीय जनता आठवड्याभरापूर्वी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बेहिशेबी मालमत्ता असलेल्या कृपाशंकर सिंह यांचंही नाव आहे, पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचं नाव नाही. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेला ज्योतिरादित्य शिंदे यांना पाडण्यासाठी काँग्रेसमधून एक नेता भाजपाने घेतला होता. तो निवडून आला होता. पण आता त्याच तिकीट कापून पुन्हा ज्योतिरादित्य शिंदे यांना देत आहेत. असं सर्व विचित्र पाहिल्यानंतर यांना गाडायच नाही तर काय करायचं? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Raj Thackeray : महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून…; राज ठाकरेंचे मराठा समाजाला आवाहन

उद्धव ठाकरे म्हणाले की, यांना वाटत असेल की, शिवसेनेचे काही गद्दार फोडले म्हणजे शिवसेना आपल्याकडे येईल, पण या जोगेश्वरी अंधेरी या सर्व भागामध्ये म्हणजेच उत्तर पश्चिम मतदार संघात तुम्ही प्रयत्न करून बघाच. किती फोडायचं तितके फोडून बघाच. पण इथले जे शिवसैनिक आहेत, ते शिवसैनिक नाही तर धगधगती मशाल आहे. त्यामुळे तुम्ही फोडताय तेवढ फोडाच, जे गद्दार आहेत ते फुटतील पण जे निष्ठावान आहेत ते कसे फुटणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -