घरमुंबईभायखळा येथे शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर

भायखळा येथे शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान शिबिर

Subscribe

भायखळा पश्चिम येथील सुंदर गल्ली समोरील शिवनेरी बिल्डिंग या इमारतीच्या तळमजल्यावर शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात युवकांनी गर्दी केली. या उस्फुर्त प्रतिसादाने भारावलेले मंडळाचे अध्यक्ष सैनिकराव यांनी दरवर्षी अशाच प्रकारे समाजपयोगी उपक्रम राबवण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि जीवनदान असल्याची सांगत गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यांचे स्वागत करीत होते. तर लवकरात लवकर कोरोना संकट निघून जावे, असे आवाहनही शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले. हे रक्तदान शिबिरी शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर जे.जे. महानगर रक्तपेढी यांच्यावतीने रविवारी घेण्यात आले होते.

- Advertisement -

शिवनेरी मंडळातर्फे विभागात सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. रक्तदान शिबिरासाठी डॉ. नीता डांगे, डॉ. उमर पटेल यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सैनिक राव, नितेश गावकर, गणेश पाटील, रूणाल कानडे यांनी मेहनत घेतली.

कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी जपणारा शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उपक्रम

गणपतीची वर्गणी न काढता रक्तदान शिबिर; शिवनेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, August 30, 2020

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -