घरताज्या घडामोडीपुलांच्या कामांसाठी पालिका रेल्वेला मोजणार ७०० कोटी रुपये

पुलांच्या कामांसाठी पालिका रेल्वेला मोजणार ७०० कोटी रुपये

Subscribe

मुंबई महापालिका रेल्वे मार्गावरील पुलांच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाला तब्बल ७०० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे पुलांचे काम करणे सुलभ होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची बांधणी करणे, लोअर परेल येथील रेल्वे पूल, फेरार रेल्वेपुलावर पुन्हा गर्डर टाकणे, भायखळा रेल्वे पुलाचे काम आदी कामांसाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिकेकडे तब्बल ७०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेने रेल्वेला सदर रक्कम देण्यासाठी २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातही २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी काळात रेल्वे मार्गावरील ११ पूल आणि एक भुयारी वाहतूक मार्ग यांच्या पुनर्बांधणीचे काम ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, टिळक रेल्वे लाईन पूल आणि रे रोड रेल्वे लाईन पूल या पुलांच्या सर्वसाधारण आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. या पुलांचे पुनर्बांधकाम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.


हेही वाचा – कायद्याच्या अधिष्ठानावर एकच प्राधिकरण पाहिजे – भाजप

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -