घरताज्या घडामोडीकायद्याच्या अधिष्ठानावर एकच प्राधिकरण पाहिजे - भाजप

कायद्याच्या अधिष्ठानावर एकच प्राधिकरण पाहिजे – भाजप

Subscribe

मुंबई महापालिका मजबूत हवी. प्राधिकरणासाठी कच्चा अभ्यास नको.

मुंबईत एकच नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महापालिका असावी हा भावनात्मक दृष्ट्या केलेला विचार असून त्याला भाजपाचे समर्थन आहे. मात्र कायद्याच्या अधिष्ठानावर एकच प्राधिकरण पाहिजे, असे भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मात्र प्राधिकरणाबाबत कच्चा अभ्यास नको, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुंबईत विविध प्राधिकरण आहेत. वास्तविक, मुंबई महापालिका हे एकच प्राधिकरण असायला हवे. कारण मुंबई महापालिकेला मजबूत करा, ही भाजपचीच मागणी आहे. मात्र प्राधिकरणाची केलेली मागणी ही कच्च्या अभ्यासावर सोडवलेल्या प्रश्नपत्रिके सारखी आहे. कारण मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एअरपोर्टस अँथोरिटी ऑफ इंडिया, रेल्वे अशी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची विविध प्राधिकरणे मुंबईत काम करतात. त्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करुन निर्णय घ्यावा लागेल. पण त्याचा विचार न करता, कायदेशीर अधिष्ठानाचा विचार न करता कच्च्या अभ्यासावर सोडवलेल्या प्रश्नपत्रिका सारखी ही मागणी आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्पात लपवाछपवी

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील सगळी आकडेवारी म्हणजे बनवाबनवी आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे लपवाछपवी ते बनवाबनवी याचा एक वर्षाचा प्रवास मुंबईकरांना सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.


हेही वाचा – पहिल्या तीन दिवसात ९७ लाख प्रवाशांचा लोकल प्रवास,वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -