घरताज्या घडामोडीमालाड रेल्वे स्थानकाजवळील १९ दुकानांवर पालिकेची कारवाई

मालाड रेल्वे स्थानकाजवळील १९ दुकानांवर पालिकेची कारवाई

Subscribe

पश्चिम उपनगरातील मालाड (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या एम.एम. मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर पालिकेने शुक्रवारी जेसीबी चालवून ती दुकाने जमीनदोस्त केली.

मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील आनंद मार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या एम.एम. मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर पालिकेने शुक्रवारी जेसीबी चालवून ती दुकाने जमीनदोस्त केली. त्यामुळे आता या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन रस्ते वाहतूक सुरळीत होणार आहे. पादचाऱ्यांनाही रस्ता मोकळा झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

मालाड (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेरील आनंद मार्गाचा वापर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. याठिकाणी असलेल्या कृत्रिम दागिन्यांची बाजारपेठ आणि मासळी बाजारामुळे दररोज किमान १ लाख २० हजार नागरिकांची वर्दळ या परिसरात असते. उपनगरीय स्थानकाला लागून असलेल्या या परिसरातील बांधकामांमुळे देखील रस्त्यावर नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेता, पी/उत्तर विभागाने याठिकाणी रस्ते रूंदीकरणाचे काम हाती घेतले.
या रस्ता रुंदीकरण रेषेमध्ये एकूण १९९ बांधकामे अडथळा ठरत आहेत.

- Advertisement -

त्यापैकी पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल रोजी एम.एम. मिठाईवाला दुकानासह एकूण १९ दुकानांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबी द्वारे कारवाई केली. या कारवाईमुळे सुमारे १५ ते २० फूट रस्ता रूंद करणे शक्य झाले आहे. या कारवाईमुळे रस्ता रुंद करुन, वाहतूक सुरळीत करण्यासह नागरिकांनाही रस्त्याचा सुलभपणे वापर करणे शक्य होणार आहे.

महापालिकेचे उपआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या पर्यवेक्षणाखाली या १९ दुकाने हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी, महापालिकेचे १५ अभियंते, ४ पोकलेन, २ जेसीबी आणि ४ डंपर तसेच ४० कामगारांचा वापर करून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -