घरमुंबईBMC In Action : वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सोने-चांदी गलाई भट्टी, धुरांड्यांवर...

BMC In Action : वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सोने-चांदी गलाई भट्टी, धुरांड्यांवर कारवाई

Subscribe

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वायू व धुळीचे प्रदूषण आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक पाऊले उचलली आहेत. प्रदूषणाला कारणीभूत काळबादेवी, झवेरीबाजार, भुलेश्वर परिसरात सोने- चांदी गलाईच्या कारखाने आहेत. मात्र, पालिकेने सोमवारी (6 नोव्हेंबर) चार भट्ट्या व धुरांड्यांवर कारवाई करून ते हटविले आहेत. त्यामुळे या परिसरातील इतर सोने-चांदी गलाई व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (BMC In Action Action on gold and silver furnaces dhurandas which cause air pollution)

सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात वायू व धुळीचे प्रदूषण आहे. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. न्यायालयानेही या प्रदूषणाची गंभीर दखल घेऊन महापालिकेला झापले. त्यामुळे पालिका कामाला लागली. पालिकेने तातडीने प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करीत कडक उपाययोजना सुरू केल्या. तसेच, इमारत बांधकामाच्या ठिकाणी धडक देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांवर दंडात्मक कारवाईही केली. डेब्रिज वाहून नेणाऱ्या काही प्रदूषणकारी वाहनांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाईही सुरू केली आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या बेकरींवरही पालिकेची करडी नजर आहे. त्याचप्रमाणे झवेरीबाजार, काळबादेवी परिसरात सोन्याची मोठी दुकाने, शोरूम आहेत. सोने – चांदीचे दागिने घडविण्याचे काम येथील पालिकेच्या ‘सी’ विभागात नागरी वस्तीत सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या काही भट्ट्या व धुरांडी आहेत. या ठिकाणी पालिकेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली व प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या चार भट्टी, धुरांडे यांवर तोडक कारवाई करून ते हटविले.

- Advertisement -

हेही वाचा : टाइम आऊट प्रकरणाचा वाद SPORTSMANSHIP ला ठेच पोहोचवणारा; मैदानात आणि बाहेरही

मुख्यमंत्र्यांनी केल्या प्रशासनाला सूचना

मुंबईतील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्‍या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. त्यासोबतच आता व्यापक आरोग्य हित लक्षात घेता आयुक्तांनी वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.या निर्देशांनानुसार नागरी वस्‍तीत सोने चांदी वितळवणाऱ्या भट्टींवर (गलाई व्‍यवसाय) महापालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. 6 नोव्‍हेंबर रोजी ‘सी’ विभागातील धानजी मार्ग आणि मिर्झा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या अर्थात गलाई व्‍यावसायिकांचे एकूण 4 धुराडे (चिमणी) कारवाई करून हटविण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या ताफ्याचा अपघात, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

 

यामुळे करण्यात आली कारवाई

सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारा वायू चिमणी, धुराडे याद्वारे हवेत सोडला जातो. शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्‍यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत चार भट्टी, धुराडे यांवर कारवाई करून ते हटविण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -