घरCORONA UPDATEलसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांची आता RT-PCR चाचणी होणार नाही, पालिकेची नवी SOP

लसीकरण पूर्ण झालेल्या प्रवाशांची आता RT-PCR चाचणी होणार नाही, पालिकेची नवी SOP

Subscribe

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने आता पालिका निर्बंध टप्प्याटप्याने हटवत आहे. यातच लसीकरण पूर्ण करणाऱ्या प्रवाशांची आता मुंबईत प्रवेश करताना आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार नाही. तसेच त्यांना आरटी-पीसीआर रिपोर्ट दाखवण्याचीही गरज लागणार नाही. याबाबत सध्या नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम (SOP) तयार करण्याच्या दिशेने मुंबई महानगरपालिका काम करत आहे.

एप्रिल महिन्यात राज्य सरकारने उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा, गुजरात, दिल्ली, एनसीआर, राजस्थान आणि उत्तराखंड हे ‘कोरोना संवेदनशील राज्य’ म्हणून घोषित केली. त्यामुळे पालिकेने जाहीर केलेल्या एसओपीनुसार, या राज्यांमधून लांब पल्ल्ल्यांच्या गाड्यांमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना रेल्वे स्थानकात निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक होते. तर हवाई मार्गे मुंबईत येणाऱ्या प्रवाशांनाही चेकआउट पूर्वी निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी जमा करावी लागत होती. प्रवाशांना मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांच्या आत हा चाचणी अहवाल जमा करावा लागेल, असेही नियमांत नमूद होते.

- Advertisement -

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अधिक नागरिक लसीकरण करीत आहेत. यामुळे पालिका लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याच्या दिशेने काम करत आहोत. लसीकरण पूर्ण केलेल्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात पालिकेने नव्या एसओपी तयार केल्या असून केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी मिळणे बाकी आहे.

दरम्यान विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन ठेवणे केंद्राने अनिवार्य केले आहे. मात्र केंद्राने परवानगी दिल्यास पालिका या नियमातही शिथिलता आणू शकेल. असेही अधिकारी म्हणाले. यापूर्वी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच लसीकरण मोहिम त्या वेगाने सुरु नव्हती, मात्र आता लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरु असून सर्वाधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे काही निर्बंध कमी करण्याचा विचार करत आहोत.

- Advertisement -

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे किंवा विमान प्रवाशांना आता कोव्हिशील्ड किंवा कोवॅक्सिन या दोन्हीपैकी एक लसीचे दोन घेतलेल्या प्रवाश्यांसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल, तर स्पुतनिक व्ही लस घेतलेल्या प्रवाश्यांसाठी फक्त एकचं डोस असल्याने त्यासंबंधीत प्रमाणपत्र दाखवावे लागेल.


पुलवामात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पोलीस ताफ्यावर हल्ला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -