घरमुंबईत्या' अपात्र १२ नगरसेवकांकडे ४० लाखांची थकबाकी ; मालमत्ता जप्त करा

त्या’ अपात्र १२ नगरसेवकांकडे ४० लाखांची थकबाकी ; मालमत्ता जप्त करा

Subscribe

गेल्या काही वर्षात २४ नगरसेवक अपात्र, आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांची माहिती

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने आणि अन्य कारणास्तव अपात्र ठरलेल्या शिवसेना, कॉंग्रेस,भाजप यांचे प्रत्येकी ३, राष्ट्रवादी काँग्रेस -१ आणि अपक्ष २ अशा एकूण १२ नगरसेवकांकडे पालिकेचे मानधन, भत्ते आदींपोटी ४० लाखांची थकबाकी गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे ; मात्र त्यांनी ती आजपर्यंत पालिकेकडे जमा केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेकडून माहितीच्या कायद्याच्या अधिकारात सादर केलेल्या अर्जाच्या उत्तरात मिळाली आहे. ही ४० लाखांची थकबाकी न देणाऱ्या नगरसेवकांची मालमत्ता जप्त करून त्याची वसुली करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही वर्षात २४ नगरसेवक अपात्र

मुंबई महापालिकेच्या मागील काही वर्षातील निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मात्र जात प्रमाणपत्र रद्द ठरल्याने व अन्य काही कारणास्तव अपात्र ठरल्याने विविध राजकीय पक्ष, अपक्ष असे २४ नगरसेवक हे अपात्र ठरले असल्याची माहिती मुंबई महापालिका चिटणीस विभागाने माहितीच्या कायद्याच्या अधिकारात दिली आहे. या २४ अपात्र नगरसेवकांमध्ये, शिवसेनेचे सर्वाधिक ८ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेस – ५, भाजप – ३, अपक्ष – ३, राष्ट्रवादी काँग्रेस -२, समाजवादी पक्ष – २, मनसे – १ यांचा समावेश आहे.

४० लाखांची थकबाकी असलेले नगरसेवक

- Advertisement -

शिवसेना -:

(१) सुनील चव्हाण – ९३,३०० रु.
(२)अनुष कोडम – ३७,९०० रु.
(३)सगुण नाईक – ३,५५,३६९ रु.

भाजप -:

(१) भावना जोबनपुत्रा – ३,४९,११९ रु.
(२)मुरजी पटेल – ५,६४,०१९ रु.
(३)केशरबेन पटेल -५,६४,०१९ रु.

- Advertisement -

काँग्रेस -:

(१)भारती धोंगडे – १,८१,३४१ रु.
(२) स्टेफी किणी – ४,८४,८१९ रु.
(३)राजपती यादव – ५,६४,७६९ रु.

अपक्ष -:

(१) चंगेज मुलतानी – ७९,२२३ रु.
(२)अंजुम फातिमा अस्लम – ४५,४८८ रु.

राष्ट्रवादी काँग्रेस -:

(१)नाजीया अब्दुल जब्बार सोफी -७,२१,८६५ रु.

मात्र अन्य अपात्र १२ नगरसेवकांपैकी ९ नगरसेवकांनी पालिकेला देय असलेली लाखो रुपयांची रक्कम अदा केली आहे.तर ३ नगरसेवक अपात्र ठरल्यानंतर त्यांना पालिकेने कोणतेही मानधन, भत्ते दिलेले नसल्याचे पालिकेने माहितीच्या कायद्याच्या अधिकारात माहिती दिली आहे. यामध्ये, शिवसेनेचे सिमींतिनी नारकर, रश्मी पहुडकर, सुभाष सावंत, प्रविण देव्हारे, विश्वनाथ म्हाडेश्वर यांचा, समाजवादी पक्षाचे लालजी यादव, मोहम्मद इसाक कासीम अली शेख यांचा, काँग्रेसचे बिनीता वोरा, सिराज शेख यांचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलशन चौहाण यांचा, मनसेचे शिरीष चोगले यांचा आणि अपक्ष नारायण पवार यांचा समावेश आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -