घरमुंबईमुंबईतील वृक्षांच्या गणनेसाठी पाच वर्षांकरिता दीड कोटी

मुंबईतील वृक्षांच्या गणनेसाठी पाच वर्षांकरिता दीड कोटी

Subscribe

मुंबईतील सर्व वृक्षांची गणना करण्यात येणार आहे. जीआयएस आणि जीपीआरएस तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार्‍या वृक्ष गणनेमध्ये प्रत्येक वृक्षांसाठी ११ रुपये ३० पैसे मोजले जाणार आहेत. प्रत्येक वर्षाला सुमारे तीन लाख झाडांची गणना करण्याचे लक्ष्य आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या गणनेचे काम करण्यासाठी सुमारे १.६८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बीएआरसी व तिवरांच्या झाडांचे क्षेत्र वगळून इतर ठिकाणच्या जीआयएस तथा जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर वापरून वृक्ष गणनेची माहिती पुढील पाच वर्षांसाठी अद्ययावत ठेवण्यासाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या अखत्यारितील सर्व जमिनींवरील विद्यमान झाडांची गणना जीपीआरएस तथा जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे वृक्ष गणना करणे बंधनकारक आहे. त्यानुसार यापूर्वी केलेल्या वृक्षगणनेमध्ये २९ लाख ७५ हजार २८३ वृक्ष आढळून आले होते. त्यामुळे पुढील पाच वर्षांकरिता नव्याने वृक्षगणना करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी सार आयटी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली.

- Advertisement -

हे वाचा – आगीने वेढलेली मुंबई

उमेदवारास किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणावर नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर प्रशासनाने नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कृर्षी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, होर्टीकल्चर, अर्बोरी कल्चर तत्सम क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर अर्हता धारण करण्यास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे किंवा शासनाच्या सामाजिक वनीकरण नोंदणीकृत अशासकीय सक्रिय सदस्य, वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन आणि वृक्ष संरक्षण यामधील किमान दहा वर्षांचा अनुभव असावा, उमेदवार हा महापालिकेच्या हद्दीतील असावा, अशा अटींचा यात समावेश आहे.


 

हे देखील वाचा – मुंबई शहर हाच बाजार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -