घरमुंबईसावधान! रेल्वे भरतीच्या नावाखाली लागतोय कोट्यवधींचा चुना!

सावधान! रेल्वे भरतीच्या नावाखाली लागतोय कोट्यवधींचा चुना!

Subscribe

रेल्वेभरतीच्या नावाखाली शेकडो तरुणांना कोट्यवधींचा गंडा घातला जात असल्याचा प्रकार समोर आला असून त्यासंदर्भात

सरकारी नोकरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्या राज्याच्या बाहेर तसेच राज्यात कार्यरत आहेत. या टोळ्या रेल्वेत, तसेच केंद्र शासनाच्या विविध विभागांत नोकरी देण्याच्या नावाखाली शेकडो तरुणांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका गुन्ह्यात सुमारे २० ते २५ तरुणांची रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या टोळीने भारतीय रेल्वे भरती बोर्डाची बोगस वेबसाईट तयार करून त्या मार्फत ही फसवणूक केली असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अशाच प्रकारची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एकाला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा कक्ष ३च्या पथकाने अटक केली होती.

वेबसाईटही बोगस, जाहिरातही बोगसच!

भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून त्यात सुशिक्षित बेरोजगारांचा समावेश जास्त आहे. त्यातच सरकार दरबारी नोकरीसाठी लाखो रुपये देणाऱ्यांची संख्या देखील तेवढ्याच प्रमाणात आहे. या संधीचा फायदा घेत मुंबईसह राज्यात आणि राज्याच्या बाहेर भामट्यांनी सरकारी नोकरी देत असल्याचे ऑनलाईन दुकानच सुरु केले आहे. सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी भारतीय रेल्वे भरती बोर्ड, तसेच इतर सरकारी विभागाच्या बोगस वेबसाईट तयार करून बसले आहेत. या बोगस वेबसाईटवर सरकारी नोकरीच्या जाहिराती टाकण्यात आलेल्या आहे. या जाहिरातींना भुलून अनेक बेरोजगार तरुण या टोळ्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – पोलीस असल्याचं सांगितलं आणि लग्न करून मोकळा झाला!

भरती होण्यासाठी गेले आणि हाती तंबोरा आला!

गोरेगाव पोलीस ठाण्यात नुकत्याच दाखल झालेल्या एका तक्रारीत २० तरुणांनी रेल्वेत ‘तिकीट कलेक्टर’ या पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून या तरुणाकडून प्रत्येकी ७ लाख रुपये ऑनलाईन पेमेंट या टोळीने स्वीकारले. त्यानंतर या तरुणांना बनावट भारतीय रेल्वेचा लोगो असलेले कामावर रुजू होण्याचे बनावट पत्र, पोस्टिंग लेटर, पगाराच्या स्लिप, बोगस ओळखपत्र, तसेच इंटरनेटवर तयार करण्यात आलेल्या भारतीय रेल्वेच्या बोगस वेबसाईटवर भरती झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी प्रकाशित करण्यात आली होती. ज्या वेळी भरती झालेले उमेदवार कामावर रुजू होण्यासाठी गेले, त्या वेळी त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यांनी थेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ११ कांदिवली येथे धाव घेतली. कक्ष ११ने या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

भामटे एजंट गुन्हे शाखेच्या रडारवर!

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यभरातील तसेच राज्याच्या बाहेरील शेकडो तरुण-तरुणींची या टोळीने फसवणूक केली असून हा आकडा वाढण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. या टोळ्या राज्याबाहेर बसून हा गोरखधंदा करीत असून या टोळ्यांचे एजंट राज्यभर पसरलेले आहे. या एजंटला प्रत्येक उमेदवारामागे मोठी रक्कम मिळत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या टोळीचा उच्च पातळीवर शोध घेण्यात येत असून या टोळीचे काही एजंट गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -