घरमुंबईप्रॉपर्टीच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला

प्रॉपर्टीच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला

Subscribe

भावाविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

प्रॉपर्टीच्या वादातून भावानेच भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी कांदिवली परिसरात घडली. या हल्ल्यात आदर्श रामप्रसाद विश्वकर्मा हा 26 वर्षांचा भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी भावाविरुद्ध कुरार पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या या भावाचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता कांदिवलीतील क्रांतीनगर, इन्कलाब चाळीत घडली. आदर्श हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. 24 वर्षांचा आरोपी त्याचा लहान भाऊ असून त्यांच्यात घराच्या मालकी हक्कावरुन काही दिवसांपासून वाद सुरु होता. याच वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्याने आदर्शकडे पुन्हा प्रॉपर्टीवरुन वाद सुरु केला होता. या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन त्याने त्याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गिटारसारख्या जड वस्तूने चेहर्‍यावर आणि छातीवर हल्ला केला होता. त्यात तो गंभीररित्या जखमी होऊन बेशुद्ध पडला होता.

- Advertisement -

या घटनेनंतर तो तेथून पळून गेला. ही माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी त्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती आता सुधारत असल्याचे बोलले जाते. या घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आदर्शची बहीण पूनम अविनाश सहानी हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लहान भावाविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. मात्र गुन्हा घडल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा आता पोलिसांकडून शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -