घरमनोरंजनबाहेरचे तर बोलतातच पण मला घरातही शिव्या पडतात - बागेश्री देशपांडे

बाहेरचे तर बोलतातच पण मला घरातही शिव्या पडतात – बागेश्री देशपांडे

Subscribe



छोट्या पडद्यावरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेनं नुकताच चारशे भागांचा प्रवास पूर्ण केला. कोकणातील देवगडच्या एका गावातल्या लोकेशनवर सुरु झालेली ही कथा आता नवी मुंबई बेलापूरच्या पारसिक हिलवर येऊन पोहोचली आहे. त्याचं चित्रीकरण पारसिक हिलवरील एका बंगल्यातच सुरु आहे. त्यानिमित्त या मालिकेतील खलनायिकेच्या भूमिकेत असलेल्या बागेश्री देशपांडे सोबत गप्पा मारण्याची संधी मिळाली. या मालिकेत बागेश्रीने साकारलेली खलनायकी गौतमी दोनशेहून अधिक भागांत दिसून आली आह

यापूर्वी एका पौराणिक मालिकेतील छोट्या भूमिकेत दिसलेल्या बागेश्रीचा ‘बयो…’मधील प्रमुख मोठ्या भूमिकेचा हा पहिलाच अनुभव आहे. बागेश्री सांगते की, पुण्यात प्रॉडक्ट डिझाईनचं शिक्षण चालू असताना सहजच तिनं एक नाटकाचा ग्रुप जॉईन केला होता. तिथूनच विविध नाटयस्पर्धा आणि पुढे राज्य नाट्यस्पर्धा असा तिचा प्रवास सुरु झाला. आपल्याला अभिनय करायला आवडतोय याची तिला खात्री पटली. ऑडिशन देणं सुरु झालं आणि मालिकांची दारं तिच्यासाठी उघडली गेली.

नाटक ते मालिका असा बदल स्विकारत असताना, नाटकाचं तंत्र अवगत झालेल्या बागेश्रीला मालिकेशी जुळवून घेणं हे आव्हान होतं. पण बागेश्रीला खूप काही प्रयत्न करावे लागले नाहीत. ‘बायो…’च्या निमित्त्त तिच्या वाट्याला आलेले कोकणातील दिवस आणि मुंबईतलं वास्तव्य याबद्दल ती समाधानी आहे. मालिकेतल्या छोट्या बयोच्या सवंगड्यांसोबत तिनं कोकणात जेवढी ऑफ स्क्रीन धमाल केली होती. तेवढीच मजा आता मोठ्या बयोसोबत आणि तिच्या भावंडांसोबत ती करते आहे.

तिनं साकारलेल्या कुटील कारस्थानी गौतमीला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली आहे. याचा प्रत्यय तिला तिच्या रोजच्या जीवनात येतो. ‘तुम्ही किती छान काम करता !’ या सोबतच ‘आम्हाला तुझा खूप राग येतो.’ अश्या बोलक्या प्रतिक्रिया तिला मिळत आहेत. बागेश्री भूमिकेबद्दल सांगते की, गौतमी करताना मला स्वतःला खूप त्रास झाला. कारण मुळातच माझा स्वभाव ‘गौतमी’सारखा नाही. मी टोटली त्याच्या अपोझिट आहे. मी इथं सेटवरही असले की, सगळ्यांसोबत हसून खेळून असते. आणि गौतमी इतरांना फाट्यावर मारणारी, कुणाचंच काही न ऐकणारी आहे. त्यामुळे मला ते कॅरेक्टर पकडताना, समोरच्या को-आर्टिस्टला हाडतूड करताना असं वाटायचं की, का ही समोरच्याला एवढा त्रास देतेय?… हे सारं बागेश्री कळकळीनं सांगत होती. पण पुढे बागेश्रीने या भूमिकेचा खोलवर विचार केला. भूमिकेची मानसिकता आणि मागणी समजून घेतल्यावर ‘गौतमी’ उभी करणं तिनं लीलया पेललं. बागेश्रीने तिच्या भूमिकेला मिळालेली तर पोचपावती आमच्या सोबत शेअर केली. बागेश्री सांगते की, मी सुट्टीत घरी गेले होते तेंव्हा मी आणि माझी आई एक एपिसोड बघत होतो. माझी आई माझ्या पुढ्यात बसून गौतमीला शिव्या घालत होती ! त्यामुळे बाहेरचे तर बोलतातच पण मला घरातही शिव्या पडत आहेत. पण एका कलाकाराला याहून सुखावणारं ते काय असेल !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -