घरमुंबई‘या’ बटणहोल नीडलमुळे इंजेक्शनची सुई टोचणारच नाही!

‘या’ बटणहोल नीडलमुळे इंजेक्शनची सुई टोचणारच नाही!

Subscribe

या नव्या नीडल्समुळे रुग्णाला वेदनाच होत नसल्याचा दावा नेफ्रोप्लस कंपनीकडून करण्यात आला आहे. याशिवाय,  खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वानुसार,  दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी मोफत डायलिसिस उपचार राबवण्याचा विचार सुरू असल्याचंही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

डायलिसिस करताना सुई शरीरात जातानाच्या वेदनेचे रुग्णांना अनेक भयावह अनुभव असतात. पण, आता रुग्णांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी थोड्या प्रमाणात मदत होणार आहे. कारण, नेफ्रोप्लसने वेदनारहीत डायलिसिससाठी बटणहोल नीडल्ससारख्या अनोख्या तंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या नीडल्समुळे रुग्णाला वेदनाच होत नसल्याचा दावा नेफ्रोप्लस कंपनीकडून करण्यात आला आहे. याशिवाय,  खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वानुसार,  दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींसाठी मोफत डायलिसिस उपचार राबवण्याचा विचार सुरू असल्याचंही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.


तुम्हाला हे माहिती आहे का? – एमडीआर टीबी रुग्णांना आता इंजेक्शन घेण्याची गरज नाही

- Advertisement -

वेदना ९५ टक्क्यांहून कमी होतात

डायलिसिस उपचारात अभिनव प्रयोग करणाऱ्या नेफ्रोप्लसने रुग्णांसाठी वेदनारहीत असे पहिले बटणहोल नीडल्स वापरण्यास सुरूवात केली असून ‘बटणहोल कॅन्‍युलेशन’ हे एक असे तंत्र आहे, जे मुख्‍यत्‍वे घरात करण्‍यात येणाऱ्या हीमोडायलिसिसकरिता वापरण्‍यात येते. यामध्‍ये तीक्ष्‍ण नीडल्‍सऐवजी बोथट नीडल्‍सचा वापर करण्‍यात येतो. वेदना कमी करत रुग्‍णांकरता डायलिसिस अधिक सोपे करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. या तंत्रानुसार सलग ५ ते ६ डायलिसिस करुन एकाच ठिकाणी तीक्ष्ण सुई टोचून मांसामध्ये एक विशिष्ट मार्ग तयार केला जातो. त्यानंतर, एक बोथट सुई कॅन्‍युलेशन करता वापरतात. ही सुई मार्गातून अधिक वेदना न होता जाते. बटणहोल पद्धत ही वेदनारहीत असून डायलिसिस रुग्णांसाठी सुरक्षित आणि सोपी आहे. या पद्धतीद्वारे डायलिसिस करण्यात आलेल्या रुग्णांच्या वेदना आधीच्या पद्धतीपेक्षा ९५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे.

डायलिसिसमध्ये अभिनव प्रयोग करुन रुग्णांवर उपचार सोप्या पद्धतीने करायचे असल्यास हा एक सोपा मार्ग आहे. किडनी निकामी झालेल्‍या रुग्‍णांना जागतिक दर्जाची डायलिसिस सेवा पुरवण्‍याचा आमचा प्रयत्न आहे. वेदनारहीत कॅन्‍युलेशनसाठी बटणहोल नीडल पद्धत हा एक उपयुक्त मार्ग आहे.

विक्रम व्‍यूप्‍पाला, संस्थापक, नेफ्रोप्लस

मोफत उपचारांचीही योजना

तसंच, सर्वांना डायलिसिस उपचार मिळावेत आणि ते परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध व्हावेत या उद्देशाने नेफ्रोप्लसने ८५ शहरातील १४६ केंद्रांतून काम सुरू ठेवले आहे. पीपीपी मॉडेलसह दारिद्रय रेषेखालील व्यक्तींसाठी नेफ्रोप्लसने मोफत डायलिसिस उपचारांची योजनादेखील तयार केली आहे, असं ही विक्रम व्‍यूप्‍पाला यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -