घरमुंबईसीएसएमटीवर सीसीटीव्हीची कमतरता

सीएसएमटीवर सीसीटीव्हीची कमतरता

Subscribe

हेरिटेज इमारतीची सुरक्षा वार्‍यावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे पडत असल्यामुळे लोहमार्ग पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. सोबतच मध्य रेल्वेच्या मुख्यालय आणि विभागीय कार्यालयाच्या इमारतीमध्ये सुध्दा सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या कमी असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वेला पत्र पाठवून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची संख्या वाढविण्यास आणि जिथे कॅमेरे नाहीत तिथे कॅमेरे लावण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर 26/11 ला दहशतवादी घटना घडली आहे. तेव्हापासून या महत्वाच्या स्थानकाच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मात्र आता सुध्दा प्रवाशांच्या सुरक्षेचा द़ृष्टीकोनातून मध्य रेल्वेची तयारी कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत संपूर्ण परिसर सामावला जात नसल्याची माहिती समोर आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

- Advertisement -

ज्यामध्ये उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात संपूर्ण जागा समाविष्ट होत नाहीत. सीएसएमटी उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1,2 आणि 5 वर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. तर मध्य रेल्वेच्या मेन लाईन रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची सूचना लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वे प्रशासनाना दिली आहेेत. विशेष म्हणजे प्लॅटफॅार्म व्यतिरिक्त सुध्दा काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -