घरमुंबईआता ३० लोकलचे वेळापत्रक पाहता येणार जम्बो इंडिकेटवर

आता ३० लोकलचे वेळापत्रक पाहता येणार जम्बो इंडिकेटवर

Subscribe

आता लोकलचे वेळापत्रक प्रवाशांना स्पष्टपणे दिसणार आहे. तसंच दोन तासांतील वेळापत्रक एकाच वेळीस पाहायला मिळणार आहे.

प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक सुरळीत समजण्याकरिता मध्य आणि हार्बर रेल्वेने मोठे फलक बसवण्यात आले आहे. सध्या हे मोठे इंडिकेटर सीएसएमटी स्थानकावर बसवण्यात आले असून या इंडिकेटवर तब्बल ३० लोकलच्या वेळा दर्शवण्यात आल्या आहेत. यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना दोन तासांमधील सर्व वेळापत्रक एकाच वेळी पाहता येणार आहे. हे मोठे इंडिकेटर टप्याटप्यांनी इतर रेल्वे स्थानकावर बसवण्यात येणार आहे.

या इंडिकेटरमुळे फक्त लोकलचे वेळापत्रक समजणार असले तरी प्रवाशांना लोकल कोणत्या फलाटावर येणार आहे यांची माहिती दिली जाणार आहे. तसंच रद्द झालेल्या फेऱ्यांचीही या इंडिकेटरवरून माहिती मिळणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकाची देखील माहिती मिळणार आहे. या इंडिकेटरमध्ये सध्याची वेळ, लोकल येण्याची वेळ, स्थानकाचे नाव, जलद आहे की धीमी याबाबत सर्व माहिती दर्शवली जात आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये हे इंडिकेटर हार्बरच्या एक आणि दोन नंबरच्या फलाटासमोर लावण्यात आले आहे. तसंच दुसरे इंडिकेटर हे कल्याण दिशेला असलेल्या पुलावर लावण्यात येणार असून गर्दीच्या स्थानकांत हे मोठे इंडिकेटर बसवण्यात येणार आहे. या इंडिकेटरमुळे सीएसएमटी लोकल स्थानकावरील गर्दीला आळा बसेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आता फलाटावरील असलेल्या इंडिकेटर पेक्षा हे इंडिकेटर कमी उंचीवर आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक स्पष्ट दिसेल. अशा प्रकारचे इंडिकेटर हे पहिल्यांदा बसवण्यात आले आहे. प्रवाशांना या मोठ्या इंडिकेटरमुळे लोकलचे वेळापत्रक पाहण्यास सोयीस्कर होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -